मराठा मोर्चा नियोजन बैठक
By admin | Published: September 19, 2016 01:09 AM2016-09-19T01:09:03+5:302016-09-19T01:09:03+5:30
विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला या समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
पुणे : पुणे शहरात येत्या २५ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या 'मराठा क्रांती मूक मोर्चा'च्या पूर्वतयारीसाठी विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला या समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के, नगरसेवक अनिल टिंगरे, सतीश म्हस्के, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, मनसेचे विभागाध्यक्ष मोहन शिंदे (सरकार), सहआयुक्त ज्ञानेशवर मोळक, सुनील टिंगरे, सागर माळकर, शशिकांत टिंगरे, रमेश खांदवे, कर्मभूमी प्रतिष्ठानचे सुनील खांदवे (पाटील), लक्ष्मण देवकर, विनोद पवार, धनंजय जाधव, शैलजा मोळक, प्रज्ञेश मोळक, डॉ. रायचंद आढाव, डॉ. दीपक ढेरे, डॉ. दत्ता खैरनार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अनेकांनी आपले मत नोंदवले व मोर्चा आणि आंदोलनाविषयी सूचना केल्या. विशेष म्हणजे या बैठकीसाठी कुणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता, केवळ सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली होती. तरीही नागरिकांनी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ज्ञानेश्वर मोळक यांनी प्रास्ताविकात मराठा मूक मोर्चा कुठल्याही समाजाविरोधात नसून, मराठ्यांच्या मागण्यांसाठी असल्याचे म्हटले.
प्रज्ञेश मोळक यांनी मोर्चाच्या नियोजनाची माहिती देऊन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. शैलजा मोळक यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
प्रकाश म्हस्के म्हणाले, की अनुसूचित जाती-जमाती अत्याचारविरोधी कायद्याचा (अट्रॉसिटी) काही प्रमाणात गैरवापर होत आहे. मराठा समाजाने मागासवर्गीयांवर अन्याय केलेला नाही. पूर्वीची परिस्थिती बदलली असून, मागासवर्गीय समाजही चांगले जीवन जगत असल्याने या कायद्याची गरज उरलेली नाही, त्यामुळे हा कायदाच रद्द झाला पाहिजे.