बुलढाण्यात उद्या मराठा क्रांती मोर्चा
By admin | Published: September 25, 2016 06:20 PM2016-09-25T18:20:23+5:302016-09-25T18:20:23+5:30
रविवारी येथील शरद कला महाविद्यालयाच्या मैदानावर दहा हजारांपेक्षा जास्त शिस्तसेवकांना मराठा क्रांती मोर्चानिमित्त प्रशिक्षण देण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 25 - जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी येथील शरद कला महाविद्यालयाच्या मैदानावर दहा हजारांपेक्षा जास्त शिस्तसेवकांना मराठा क्रांती मोर्चानिमित्त प्रशिक्षण देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी यासह अन्य मागण्यांसाठी सोमवार २६ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शिस्त कायम राहावी तसेच कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होवू, नये याकरिता शिस्तसेवकांना प्रशिक्षण देण्यात येते.
रविवारी बुलडाणा येथे संपूर्ण जिल्ह्यातून दहा हजारांपेक्षा जास्त शिस्तसेवक सहभागी झाले होते. त्यांना दुपारी ४ वाजता प्रशिक्षण देण्यात आले. उद्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची लोक गर्दी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमीवरच बंदोबस्ताचा आज हा आढावा घेण्यात आला आहे.