मेधा खोले यांच्याविरोधातील २५ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित; समन्वयक समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:40 PM2017-09-21T14:40:56+5:302017-09-21T14:50:09+5:30

हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे.

The Maratha Kranti Morcha postponed on September 25 against Medha Khole; The decision of the coordinator committee | मेधा खोले यांच्याविरोधातील २५ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित; समन्वयक समितीचा निर्णय

मेधा खोले यांच्याविरोधातील २५ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित; समन्वयक समितीचा निर्णय

Next
ठळक मुद्दे  हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर,  तुषार काकडे, संतोष शिंदे, अंगद माने, संगीता भालेराव, राहुल पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़ 

पुणे, दि 21-  हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर,  तुषार काकडे, संतोष शिंदे, अंगद माने, संगीता भालेराव, राहुल पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़ 

शांताराम कुंजीर यांनी सांगितले की, डॉ. खोले यांनी स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार करू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विनंती केली होती. परंतु खोले यांनी ही विनंती धुडकावून लावत निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी निर्मला यादव यांच्या अदखलपात्र गुन्ह्यांचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गुळवे पाटील कोर्टाकडून परवानगी घेऊन तपास चालू केला आहे. त्यामध्ये तपासाअंती चार्जशीट दाखल करून गंभीर कलमे वाढवण्याची शक्यता आहे़ 

 तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया, तपास सुरू केल्यामुळे २५ सप्टेंबर रोजीचा नियोजित निषेध मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. मराठा अस्मिता परिषद २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केली आहे.

Web Title: The Maratha Kranti Morcha postponed on September 25 against Medha Khole; The decision of the coordinator committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.