मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 07:50 AM2023-09-14T07:50:56+5:302023-09-14T07:51:36+5:30

Maratha-Kunbi : सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांना कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता. १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे.

Maratha-Kunbi alone, recorded in the Nizam's Gazetteer, there were 2,88,824 Kunbis in Aurangabad district in 1884. | मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर - सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांना कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता. १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे. त्या गॅझेटियरच्या ई-आवृत्तीमध्ये मराठा व कुणबी एकच असल्याचा उल्लेख २००६ साली वगळण्यात आला. मात्र, मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक उल्लेख गॅझेटमध्ये सापडतात. 

मराठा आरक्षण न्याय हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र बनसोड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. निजामाच्या काळातील गॅझेटियर ऑफ द निजाम्स डमेनिअसन्स औरंगाबाद डिस्ट्रिक्ट- १८८४ नुसार एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या २,८८,८२४ होती. एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ४०.६३% होते. हा कुणबी समाज म्हणजेच मराठा हाेय. 

१८८१ च्या जनगणनेतही एकच जात अशी नाेंद 
- मराठा कंट्री, मराठा बुक्स, मराठा ब्राह्मण असे उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहेत. कुणबी हा उल्लेख हा आजच्या मराठा जातीसाठीच असल्याचे विविध संदर्भातून स्पष्ट होते, असेही प्रा. बनसोड यांनी सांगितले. 
- याविषयी डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी संशोधन केले असून, त्यांच्याकडे गॅझेटची मूळ प्रत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा एकच असल्याची नोंद केल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title: Maratha-Kunbi alone, recorded in the Nizam's Gazetteer, there were 2,88,824 Kunbis in Aurangabad district in 1884.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.