एक मराठा, लाख मराठा, मोर्चात राजकीय बॅनरबाजीला मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:51 AM2017-08-08T04:51:58+5:302017-08-08T05:02:37+5:30

मुंबईतील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचे चोख नियोजन झाल्याचा दावा, मोर्चाच्या मुंबई समन्वय समितीने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर या मोर्चाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने वा संघटनेने आपल्या स्वार्थासाठी करू नये यासाठी मोर्चात अधिकृत बॅनरशिवाय राजकीय पक्ष, वैयक्तिक संस्था व संघटनांचे बॅनर्सना मज्जाव करण्यात आला आहे.

 A Maratha, a million Marathas, ready for traffic police: The committee's top planning claim | एक मराठा, लाख मराठा, मोर्चात राजकीय बॅनरबाजीला मज्जाव

एक मराठा, लाख मराठा, मोर्चात राजकीय बॅनरबाजीला मज्जाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचे चोख नियोजन झाल्याचा दावा, मोर्चाच्या मुंबई समन्वय समितीने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर या मोर्चाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने वा संघटनेने आपल्या स्वार्थासाठी करू नये यासाठी मोर्चात अधिकृत बॅनरशिवाय राजकीय पक्ष, वैयक्तिक संस्था व संघटनांचे बॅनर्सना मज्जाव करण्यात आला आहे.
या मोर्चात मुंबईतील मराठा बांधव पूर्णपणे स्वयंसेवकांच्या भूमिकेत असतील, असेही समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले की, मराठा बांधवांच्या चहानाश्त्यापासून पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय आणि सर्वच प्रकारच्या सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवकाची फौज तैनात असेल. याशिवाय स्थानिक पातळीवर विभागनिहाय मंडळे आणि संस्थाही आंदोलकांच्या मदतीला असतील. नवी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरातील स्वयंसेवकही मुंबईकरांच्या मदतीला आहेत. स्वयंसेवकांची ओळख पटावी, म्हणून त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्र वाटण्यात येत आहेत. बहुतेक रुग्णालयांतील वैद्यकीय पथके आंदोलकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी तत्पर असतील.
या कालावधीत मोर्चेकºयांच्या वाहनांसह शहरातील वाहतुकीसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तयारी केली आहे. यात शहरातील काही वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात
आले आहेत. काही मार्गांना पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरांतील
वाहतूक मार्गांचे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल हे ९ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत असतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. मोर्चाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून वाहतुकीबाबतच्या सर्व सूचना टिष्ट्वटर आणि रेडिओवर देण्यात येणार आहेत.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे. जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील.
जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
आझाद मैदान शेजारील ओ.सी.एस. जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत जाणारा हजारीमल सोमानी मार्ग दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.
कर्नाक बंदर जंक्शनकडून कर्नाक ब्रिजकडे जाण्यासाठी वाहनांना बंदी असेल.

मुंबईकरांसाठी पर्यायी वाहतूक मार्ग
किंग्ज सर्कल येथून डावे वळण घेत, चार रस्त्याने पी डिमेलोकडे जाणारी वाहतूक चालू असेल.
दादर टीटीपासून डावे वळण घेत, चार रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू असेल.
नायगांव क्रॉस रोड येथून डावे वळण घेत, आर. ए. के. चार रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू असेल.
ग. द. आंबेकरमार्गे माने मास्तर चौक ते आर. ए. के. चार रस्ता जाणारी वाहतूक सुरू असेल. मादाम कामा रोडवरून हुतात्मा चौक येथे उजवे वळण घेत, काळाघोडामार्गे ओल्ड कस्टम हाउस, शहीद भगतसिंग मार्गाकडे जाणारी वाहतूक सुरळीत असेल.
एन. एम. जोशी मार्ग ते लोअर परेल रेल्वे स्टेशन ते वरळी नाकामार्गे हाजीअली कडे जाणारी वाहतूक सुरू राहील.
एन. एस. रोड ( मरीन ड्राइव्ह) वरून पेडर रोड हाजीअलीमार्गे सी लिंक किंवा इ-मोजेस रोडवरून सिद्धिविनायक ते सेनाभवन मार्ग वाहतुकीसाठी चालू राहील.

रेल्वेचे ‘जादा’ डबे : खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे, मराठा मोर्चानिमित्त एक्स्प्रेसला जादा डब्बे जोडण्याची मागणी केली होती. ती मागणी प्रभूंनी मान्य केली आहे. यानुसार, सात एक्स्प्रेस ट्रेनला अप-डाउन मार्गावर सामान्य दर्जाचा प्रत्येकी एक डबा जोडण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ११०२२ चालूक्य एक्स्प्रेस,(११४०२) नंदिग्राम एक्स्प्रेस, (१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेस, (११०२८) मुंबई मेल, (१७०५८) देवगिरी एक्स्प्रेस, (५१२६१) अमरावती वर्धा पॅसेंजर, (१८०३०) शालीमार एलटीटी एक्स्प्रेस या ट्रेनला एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

वैद्यकीय सुविधांसाठी सज्ज...
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिअशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवितील. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे. प्रत्येक गटाचे किमान २० डॉक्टर्स व विद्यार्थी प्रत्येकी नेमून दिलेल्या बुथवर सेवा देतील. सायनच्या प्रियदर्शनी पार्क येथे सायन रुग्णालयाची टीम, भायखळ््याच्या राणीबाग येथे केईएम टीम, जे. जे. उड्डाणपुलाजवळ जे. जे. टीम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ नायर टीम व आझाद मैदानात जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू वैद्यकीय सुविधा पुरवितील. मोर्चाच्या मार्गावरील प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर रुग्णवाहिकेची सुविधा असेल.

पोलिसांचे महापालिकेला पत्र
मोर्चादरम्यान उपस्थितांना सेवा-सुविधा द्याव्यात, यासाठी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना विनंती केली आहे. महात्मा गांधी रोडवरील दुभाजकावर ओ. सी. एस. वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा जंक्शनपर्यंत बॅरिकेट्स उभारावे. आझाद मैदान परिसरात मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतात एखादी घातपाती वस्तू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मैदानावरील गवताची कापणी करावी, अशी मागणी मनोज कुमार शर्मा यांनी अजय मेहता यांच्याकडे केली आहे.

वाहन दुरुस्ती पथकांची सोय
मोर्चेकरांच्या वाहनांत बिघाड झाल्यास, तो दुरुस्त करण्यासाठी मुंबई विभागात वाहन दुरुस्ती पथक कार्यरत असेल. या पथकाद्वारे नवी मुंबईमार्गे येणाºया सर्व वाहनांना सुविधा पुरविली जाईल. त्यासाठी कळंबोली, कामोठे, मानसरोवर, खारघर, बेलापूर, सिवुड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या ठिकाणीही पथक तैनात करण्यात आली आहेत.

चारचाकी नकोच
मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांतील आंदोलकांनी चारचाकी घेऊन मोर्चात सामील होऊ नये, असे आवाहन समितीने केले आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी शक्य असेल, त्या रेल्वे स्थानकांजवळ वाहने पार्क करून, रेल्वेचा वापर करून, मोर्चाचे इच्छीत स्थळ गाठावे. त्यासाठी आंदोलकांना हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन आणि रे रोड, तर मध्य रेल्वेचे भायखळा आणि पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर उतरता येईल, असेही समितीने सांगितले.

पार्किंगची व्यवस्था बीपीटीमध्येच!
सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सिमेंट यार्डमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी बीपीटी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे. या ठिकाणी १० हजार वाहनांना सामावून घेण्याची क्षमता आहे. सुमननगर जंक्शन येथून भक्तीपार्क मार्गे पूर्व मुक्त मार्गाच्या (ईस्टर्न एक्स्प्रेस वे) खालील मार्गावरून, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील मोकळ्या जागेत पोहोचता येईल. वाशीमार्गे येणाºया मोर्चेकरांची वाहने खाडीपूल टोलनाका ते पांजरपोळ चेंबूरहून सुमननगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील वाहनतळावर येतील. ठाणेमार्गे येणारी वाहने पूर्व द्रुतगतीमार्गे व पश्चिम उपनगरांतून येणारी वाहने सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडमार्गे अमरमहल जंक्शन येथून मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील वाहनतळांवर येतील. काही वाहने कलानगर, टी जंक्शन धारावीमार्गे सायन रेल्वे स्टेशन येथून डावे वळण घेऊन, हायवे अपार्टमेंटमार्गे सुमननगर येथून यू टर्न घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे येतील.

35 हजार पोलीस, ड्रोनची नजर

मराठा क्रांती मोर्च्याच्या दिवशी ३५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून, या दिवशी पोलिसांची साप्ताहिक सुट्टी, रजा रद्द करण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसासह राज्य राखीव दल, क्यूआरटीसह विविध पथके तैनात असतील. आयुक्त दत्ता पडसलगीकर हे बंदोबस्ताचे नियोजन करीत असून, त्यासाठी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाºयांची सुकाणू समिती बनविण्यात आलेली आहे. शहर व उपनगरातील अपर आयुक्त व उपायुक्तांवर आपापल्या कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे.

अशी असेल मोर्चाची आचारसंहिता
मुंबई मराठा क्रांती मोर्चा मूक असून, कोणताही आंदोलक घोषणा देणार नाही.
मोर्चात अधिकृत बॅनरशिवाय कोणतेही राजकीय, वैयक्तिक संस्था व संघटनांचे बॅनर्स चालणार नाहीत.
कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधातील घोषणा किंवा मागण्यांचे बॅनर झळकविण्यास मनाई असेल.
मोर्चात स्वयंशिस्त पाळताना पोलिसांना सहकार्य केले जाईल.
व्यसन केलेल्या आंदोलकांना मोर्चात सामील होता येणार नाही.
घाई गडबड न करता, महिला, लहान मुले व वृद्धांना पुढे जाऊ दिले जाईल.
मोर्चादरम्यान जमा होणाºया पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पाऊच आणि कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
मोर्चात संशयास्पद वस्तूू किंवा व्यक्ती दिसल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
मोर्चात कुणीही आंदोलक वाट चुकल्यास, मराठा स्वयंसेवक किंवा

Web Title:  A Maratha, a million Marathas, ready for traffic police: The committee's top planning claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.