मराठा मोर्चा ; मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर टोल वसुली बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 10:50 AM2017-08-09T10:50:57+5:302017-08-09T11:20:32+5:30
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद आहे.
मुंबई, दि. 9- मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली मंगळवारपासून बंद ठेवण्यात आली आहे तसंच मोर्चाच्या दिवशी म्हणजेच बुधवारीही टोल वसुली बंद राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका, अशी सगळीकडे टोलवसुली बंद आहे.
मुंबईत बुधवारी सकाळपासून मराठा क्रांती मूकमोर्चा लोकांची गर्दी वाढते आहे. मोर्चाची जशी जय्यत तयारी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी मुंबईत बुधवारी भव्य मोर्चा काढला जातो आहे.
बीएमसीकडूनही खास सुविधा
या मार्गावर टॉयलेट्सची सोय
प्रतिक्षा नगर नाल्यावर 2
जे के केमिकल नाला 3
सिमेंट यार्ड बीपीटी 4
भायखळा 2
एटीएस कार्यालय 1
आझाद मैदान 2
बीएमसीकडून पाण्याची व्यवस्था
वसंतदादा पाटील कॉलेज सायनजवळ दोन पाण्याच्या गाड्या
आझाद मैदानावर दोन पाण्याच्या गाड्या
बीपीटी सिमेंट यार्डवर 4 गाड्या
राणीची बागेजवळ 1 गाडी
वैद्यकीय सुविधा
प्रियदर्शनी 20 डॉक्टर
राणीबाग- 20 डॉक्टर
जे.जे उड्डान पूल- 20 डॉक्टर
सिमेंट यार्ड बीपीटी 4 डॉक्टर
भायखळा 2 डॉक्टर
एटीएस कार्यालय 1 डॉक्टर
आझाद मैदान 2 डॉक्टर