निवडणुकीत मराठा मोर्चा तटस्थ!

By admin | Published: February 19, 2017 01:38 AM2017-02-19T01:38:16+5:302017-02-19T01:38:16+5:30

मराठा आरक्षणासाठी राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांत तटस्थ भूमिका घेतली आहे. तरीही ठरावीक लोक

Maratha Morcha election neutral! | निवडणुकीत मराठा मोर्चा तटस्थ!

निवडणुकीत मराठा मोर्चा तटस्थ!

Next

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांत तटस्थ भूमिका घेतली आहे. तरीही ठरावीक लोक मराठा समाजाच्या नावाने पाठिंबा आणि विरोध घोषित करत आहेत. याचसंदर्भात येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मुंबईचे प्रतिनिधी वीरेंद्र पवार यांनी सांगितले. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या नावाने अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, समन्वयक व प्रतिनिधींचे संपूर्ण लक्ष ६ मार्चला मुंबईत निघणाऱ्या मोर्चाकडे आहे. काहीच दिवसांत मुंबईतील मोर्चाचा मार्ग घोषित केला जाईल. निवडणुकांत संघटनेची भूमिका काय आहे? याबाबत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यातच राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Maratha Morcha election neutral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.