नागपूर अधिवेशनावर मराठा मोर्चा
By admin | Published: October 10, 2016 05:46 AM2016-10-10T05:46:28+5:302016-10-10T05:46:28+5:30
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर १४ डिसेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय, रविवारी येथे झालेल्या
औरंगाबाद : नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर १४ डिसेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय, रविवारी येथे झालेल्या राज्यव्यापी समन्वय समितीची बैठकीत घेण्यात आला असून, मुंबईतील राज्यस्तरीय मोर्चाचे शस्त्र राखून ठेवण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
समितीचे पदाधिकारी म्हणाले की, कोपर्डीच्या घटनेनंतर ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. त्यानंतर, आतापर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांत लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले आणि उर्वरित जिल्ह्यांत मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या नऊ मागण्या-
कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपींना फासावर लटकवावे.
मराठा समाजास तत्काळ आरक्षण मिळावे.
अॅॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी तत्काळ या कायद्यात बदल करण्यात यावा.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करा.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.
छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मराठा समाजातील तरुणांना किमान कौशल्य विकास, उद्योग व नोकरी यासाठी प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी.
१९ फेब्रुवारी या एकाच दिवशी सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात यावी.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावे.