मराठा मोर्चा : डोक्यावर फेटा, हातावर मराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:22 AM2017-08-10T04:22:38+5:302017-08-10T04:22:54+5:30

मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुण-तरुणींनी हातावर टॅटू तर काहींनी डोक्यावर फेटा बांधून घेतला होता. यासाठी खास औरंगाबाद, जालना, नाशिक येथून स्वयंप्रेरणेने आलेल्या मंडळींनी मोर्चेकऱ्यांच्या डोक्यांवर फेटा आणि हातावर मराठा गोंदवून दिले.

Maratha Morcha: The Turban on the Head, the Marathas on the Hand | मराठा मोर्चा : डोक्यावर फेटा, हातावर मराठा

मराठा मोर्चा : डोक्यावर फेटा, हातावर मराठा

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 
मुंबई : मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुण-तरुणींनी हातावर टॅटू तर काहींनी डोक्यावर फेटा बांधून घेतला होता. यासाठी खास औरंगाबाद, जालना, नाशिक येथून स्वयंप्रेरणेने आलेल्या मंडळींनी मोर्चेकऱ्यांच्या डोक्यांवर फेटा आणि हातावर मराठा गोंदवून दिले. भायखळा येथील राणीबाग मैदान येथून मोर्चाची सुरुवात झाली. या वेळी मोर्चेकºयांच्या मार्गावर मुंबईतील महाविद्यालयीन तरुणींसह औरंगाबाद, जालना, नाशिक येथून आलेल्या मराठा बांधवांनी टोपी, टीशर्ट, झेंडे यांच्यासह फेटे बांधणे, टॅटू काढण्यासाठी बस्तान मांडलेले दिसले. औरंगाबादचे बद्री म्हस्के यांनी हजाराहून अधिक तरुण-तरुणींना फेटे बांधले. मंगळवारी रात्री म्हस्के त्यांच्या सात जणांच्या टीमसोबत मराठा मोर्चासाठी मुंबईत दाखल झाले होते. आपल्या मराठा बांधवांना फेटे बांधताना एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा अनेकांना त्यांनी मोफत फेटे बांधून दिले.

Web Title: Maratha Morcha: The Turban on the Head, the Marathas on the Hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.