१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:55 PM2024-06-25T14:55:50+5:302024-06-25T14:56:44+5:30

सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये, आंदोलन बदनाम केले जातंय असा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर टीका केली

Maratha protester Manoj Jarange Patil criticized the government | १३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर -  मी धनगर, ओबीसी बांधवांना विरोधक मानलं नाही. कधी आयुष्यात मानणार नाही. कुणी काय करायचे हे लोकांना माहिती आहे. लोक हुशार झालेत. पुढचा धमाका होणार आहे. १३ तारखेपर्यंत गप्प आहे. मराठा समाजाला सरकारने फसवू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगेसोयरेची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. १३ तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अंतरवाली सराटी येथे जाऊन बसणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. ६ जुलैपासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्ह्याजिल्ह्यात निघणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठ्यांचे सरकार मग मराठा पोरांवर अन्याय का? आमच्या जातीचे इतके हाल का? माझ्या शब्दाचा काहीजण गैरसमज निर्माण करतायेत. मी २०-२२ वर्षापासून लढा देतोय. प्रत्येक क्षण समाजासाठी दिला आहे. समाजाला आणि आंदोलनाला खाली मान घालावी लागेल असं कुणी बोलू नका. विचारपूर्वक बोला. आंदोलनाला कोट्यवधी मराठ्यांचा हातभार आहे. समाजात गैरसमज पसरवू नका असं आवाहन टीका करणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांना जरांगेंनी केले आहे.

दरम्यान, मराठ्यांचे नेते आता फोन करतायेत, आम्ही सोबत आहोत. सगळ्या पक्षातील ओबीसी नेता एकवटला, मराठा समाज पाठिशी पण मराठा नेते एकटवले नाहीत.  मला घाण घाण बोलणारे आहेत. समाजासाठी बोलणं ऐकायला काय फरक पडतो, माझा अपमान झाला, जातीसाठी पचवला. आजही माझ्यावर अनेक संकटे आहेत. समाज एकाबाजूला राहिला तरी आम्ही आरक्षण घेऊ. मी एकटा जरी राहिलो तरी लढणार असं मनोज जरांगे म्हणाले. 

सरकार आम्हाला फसवू शकत नाही, आम्ही आधीच डाव ओळखलाय

आमच्या म्हणण्याप्रमाणे सगेसोयरे व्याख्या घ्यायची. सरकारने खोट्या बातम्या पसरवू नये. सगेसोयरेबाबत आम्हाला फसवलं तरी ३ मागण्या आहेतच. मराठा आणि कुणबी एकच आहे हा एका ओळीचा जीआर काढायचा. आमच्या मागण्या वाढल्या नाहीत त्याच आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, दौड संस्थान, बॉम्बे गर्व्हमेंट गॅझेट लागू करा, विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. आम्ही ३-४ मागण्या त्याचसाठी ठेवल्या, सरकारने एका मागणीत फसवलं तर इतर २-३ मागण्या आहेत. आम्ही जातिवंत मराठे आहोत. त्यामुळे तुम्ही फसवू शकत नाही. आम्ही तुमचा डाव आधीच ओळखला होता. अचानक मागणी करत नाही. पहिल्यापासून आमच्या मागण्या आहेत असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 
 

Web Title: Maratha protester Manoj Jarange Patil criticized the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.