लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 02:58 PM2024-07-28T14:58:42+5:302024-07-28T14:59:37+5:30

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहेत. 

Maratha Reservation : A decision will soon be made whether to fight or to overthrow; Manoj Jarange Patil warning to the government | लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना - जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल, हक्काचं आरक्षण द्यायचं नाही ठरवलं असेल तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही, पण तिथे जायची वेळ सत्ताधारी विरोधकांनी आमच्यावर आली. माझ्या समाजाचं हित कशात हे बघावं लागणार आहे. २९ तारखेला यावर निर्णय होणार आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झालं त्यापेक्षा ५ पटीने विधानसभेत होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे, मराठ्यांवर जाणुनबुजून अन्याय करत आहात. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात, सगळ्या मुलींना मोफत शिक्षण मग फी का घेतली, मी पावत्या देतो. अर्धवट गुंतवणूक ठेवायचे. प्रवेशासाठी पैसे घेताय. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज होऊ लागलीत असं त्यांनी म्हटलं.

तसेच शरद पवार काय म्हणतायेत त्यापेक्षा माझे मन, माझे विचार काय सांगतायेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मराठ्यांचे कल्याण व्हावं, तसं लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही मिळायला हवं ही प्रामाणिकपणाची भावना आहे. बारा बलुतेदाराची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. परिणाम काहीही झाले सर्व जातीधर्माला आरक्षण दिलं पाहिजे. वेळ पडली तर सगळ्यांना एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, लोकांचा आक्रोश, संतापाची लाट कशासाठी आहे, इतका जोर का धरलाय हे समजून घेणं गरजेचे आहे. मराठ्यांच्या आरक्षणावर समाधानकारक तोडगा कसा काढायचा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही हे सरकारला कळायला हवं. उगाच डिवचायचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेला जातील. विधानसभेचं दार आतून यांनी बंद केलेत, ते उघडावी लागणार आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Maratha Reservation : A decision will soon be made whether to fight or to overthrow; Manoj Jarange Patil warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.