सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:03 AM2024-06-12T07:03:02+5:302024-06-12T07:04:46+5:30

Manoj Jarange Patil: सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे. मराठा समाजाविषयी (Maratha Reservation) माया असती तर उपोषण सुरू असताना बोलण्यासाठी चार-चार दिवस लावले नसते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Maratha Reservation: Manoj Jarange Patil accuses the government of sweet talk | सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप

सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप

 वडीगोद्री (जि. जालना) - सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे. मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना बोलण्यासाठी चार-चार दिवस लावले नसते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी जरांगे यांची प्रकृती खालावली असून, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप कोणाशीच संपर्क झालेला नाही. सरकार बैठका घेऊन निर्णय घेऊ असे, सांगून मराठ्यांना लाडीगोडी लावत असल्याचे जरांगे म्हणाले. निवडणुकीत जरांगेंच्या आंदोलनाचा प्रभाव  नव्हता या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. थोडं थांबा कळेल तुम्हाला, असे  म्हणत त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. 

आम्हाला तुमची गरज आहे : संदीपान भुमरे
शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी मंगळवारी सायंकाळी जरांगे पाटील यांची भेट घेऊन जवळपास ४५ मिनिटे चर्चा केली. आम्हाला तुमची गरज आहे, काळजी घ्या. मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. आपण उपचार घ्यावेत, अशी विनंती भुमरे यांनी जरांगे पाटील यांना केली.

Web Title: Maratha Reservation: Manoj Jarange Patil accuses the government of sweet talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.