मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आल्यास विचारात घेणार
By admin | Published: October 11, 2016 05:28 AM2016-10-11T05:28:31+5:302016-10-11T05:35:54+5:30
मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणारा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (एनसीबीसी) तो विचारात घेईल, असे
नवी दिल्ली : मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणारा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (एनसीबीसी) तो विचारात घेईल, असे आयोगाच्या एका सदस्याने सांगितले. मागासवर्गीय म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या जातींना या यादीतून वगळण्याचे किंवा आतापर्यंत समाविष्ट नसलेल्या जातींचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर हा आयोग विचार करतो.
महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या प्रबळ मराठा समाज सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांत आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी गेल्या काही आठवड्यांपासून आंदोलन करीत आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव आल्यास आयोग समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या आधारे त्यावर विचार करील, असे एनसीबीसीचे सदस्य अशोक सैनी यांनी सांगितले. तथापि, आयोगाने यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता, असेही ते म्हणाले. इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटात ११६ जातींचा समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केली होती. या यादीत मराठ्यांचा समावेश नव्हता, अशी माहितीही सैनी यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)