Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन; १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:41 AM2021-06-11T08:41:21+5:302021-06-11T08:41:42+5:30

Maratha Reservation : कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली.

Maratha Reservation: Silent agitation of Maratha community in five districts; Starting from Kolhapur on 16th June | Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन; १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन; १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

Next

कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिले आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमितून म्हणजेच कोल्हापुरातून १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला, आता आक्रमकता काय असते ती दाखवू, असा गर्भित इशाराही गुरुवारी दिला. 

कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली. त्यानंतर संभाजीराजे यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. 
सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नुसती पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा. आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार, ते ठोसपणे सांगा, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. 
नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड जिल्ह्यातही मूक आंदोलने होतील. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर एकदाच जोर लावला जाईल. पुण्यातून  थेट मंत्रालयावर लाॅगमार्च काढला जाईल आणि त्यात महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोपार्डीत १२ जूनला अभिवादन
सकल मराठा समाजाच्या आंदोलनात जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कोपार्डीतील समाधीला १२ जून रोजी खासदार संभाजीराजे भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. 

मूक आंदोलनानंतर ‘लाॅगमार्च’ ची तारीख जाहीर करणार
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलने होतील. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जायचे, हे समन्वयक ठरवतील. पुढे प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयकांशी चर्चा करून लॉग मार्चची तारीख निश्चित केली जाईल. सगळ्या ३६ जिल्ह्यांतील मराठा समाजाला पुण्यात आणून तेथून थेट मंत्रालयावर लॉगमार्चची सुरुवात होईल, असे संभाजीराजे म्हणाले. 

Web Title: Maratha Reservation: Silent agitation of Maratha community in five districts; Starting from Kolhapur on 16th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.