Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 10:44 PM2018-09-09T22:44:05+5:302018-09-09T22:49:44+5:30

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही.  त्यामुळे आलेल्या नैराश्येतून युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Maratha Reservation: youth Suicide Of Maratha Community For Reservation | Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकाची आत्महत्या

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकाची आत्महत्या

Next

 जळगाव -  मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही.  त्यामुळे आलेल्या नैराश्येतून संदीप गोविंदा घोलप (२६, रा. मुसळी ता. धरणगाव ) या युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्याने आपली व्यथा मांडली आहे.

 संदीप हा ७ रोजी  फिरायला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. यानंतर तो परतलाच नाही.  त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. रविवार रोजी सकाळी गावालगत असलेल्या विहीरीत मृतदेह असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. विहीरीजवळ काही अंतरावर त्याची चप्पल व त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.   बी.ए.झालो मात्र समाजाला आरक्षण नसल्याने मी नोकरीस लागू शकलो नाही.त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Maratha Reservation: youth Suicide Of Maratha Community For Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.