मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 10:02 AM2018-11-01T10:02:40+5:302018-11-01T12:09:34+5:30
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणातून सकाळी 8.40 वाजता जायकवाडीसाठी 4250 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर मुळा धरणातून सहा हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात आले.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नगर, नाशिक जिल्ह्यांतून विरोध होत होता. प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 9 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे.
मुळा धरणातून जायकवाडीसाठी आज सकाळी नऊ वाजता सहा हजार क्युसेक्सकने 11 दरवाज्यातून ( मो-या) पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता आठ हजार तर रात्री बारा वाजता 12 हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्यापूर्वी तीन वेळा भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी कळ दाबून नदी पात्रात पाणी सोडले. जायकवाडीसाठी तीन दिवसात 1 हजार 9 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाची साठवण क्षमता 26 हजार दलघफू आहे.
निळवंडेतून जायकवाडीला 4250 क्युसेकने 5 मोऱ्यांमधून पाणी सोडण्यात आले. दर दोन तासांनी यामध्ये वाढ केली जाणार आहे.
जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.