मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर जयंती

By Admin | Published: August 19, 2016 08:20 AM2016-08-19T08:20:15+5:302016-08-19T08:20:15+5:30

मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस.

Marathi author Gangadhar Devrawak Khanolkar Jayanti | मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर जयंती

मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर जयंती

googlenewsNext
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १९ - मराठी लेखक, चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस.
 
जीवन
गंगाधर खानोलकरांचा जन्म ऑगस्ट १९, इ.स. १९०३ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या 'खानोली' गावी झाला. त्यांचे शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात झाले.
 
साहित्यिक कारकीर्द
खानोलकरांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत २२ ग्रंथ लिहिले. अर्वाचीन वाङ्‌मय (खंड १ ते ९), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र, के.बी. ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथरचनांचा त्यात समावेश होतो. याखेरीज स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय (खंड १- २१) (इ.स. १९६२), पुणे शहराचे वर्णन (इ.स. १९७१), कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्‌मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह (इ.स. १९७७), धनंजय कीर: व्यक्ती आणि चरित्रकार (इ.स. १९७४), सोन्याचे दिवस: बा.ग. ढवळे स्मृतिग्रंथ (इ.स. १९७४) इत्यादी ग्रंथ त्यांनी संपादिले.
 
ग्रंथलेखनाखेरीज खानोलकरांनी पत्रकारिताही केली. वैनतेय साप्ताहिकाचे त्यांनी काही काळ संपादकपद सांभाळले.
३० सप्टेंबर १९९२ रोजी त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Marathi author Gangadhar Devrawak Khanolkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.