मराठीला अभिजात दर्जा कधी-ठाकरे

By admin | Published: February 28, 2015 04:46 AM2015-02-28T04:46:03+5:302015-02-28T04:46:03+5:30

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याकरिता भांडावे लागणार का? आम्हाला हा दर्जा मिळणार आहे की नाही? मराठी भाषेची महाराष्ट्रात सक्ती का नाही,

Marathi is the classical status of Thackeray | मराठीला अभिजात दर्जा कधी-ठाकरे

मराठीला अभिजात दर्जा कधी-ठाकरे

Next

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याकरिता भांडावे लागणार का? आम्हाला हा दर्जा मिळणार आहे की नाही? मराठी भाषेची महाराष्ट्रात सक्ती का नाही, असा सवाल करून आमची मुले इंग्रजी शाळेत गेली हे खरे. पण त्यांचे आजोबा घरी होते त्यामुळे घरी मराठीत बोलले गेले, असा खुलासा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की,
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज ही महाराष्ट्राने देशाला दिलेली अनमोल रत्ने आहेत. परंतु सावरकर यांचा योग्य सन्मान राखला गेला का, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच जे भारतरत्न दिले गेले त्यामध्ये सावरकर यांचा बहुमान व्हायला हवा होता, अशा शब्दांत नाराजी प्रकट केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Marathi is the classical status of Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.