अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 07:42 PM2019-06-28T19:42:31+5:302019-06-28T20:00:16+5:30

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे.

marathi Culture will see in the parade of Independence Day America | अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

googlenewsNext
ठळक मुद्दे'' अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ'' संस्थेचा असणार सहभाग  हा कार्यक्रम ४ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅन अबॉर ,मिशीगन येथे होणारअमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतील व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार भारत व अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ व प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात येणार

पुणे : काही दिवसांपासून भारतअमेरिका यांचे संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. परंतु, दोन्ही राष्ट्रांमधील बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय असोसिएशनला सहभाग नोंदविण्याची संधी प्राप्त होत आहे अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ (ए२एमएस ) अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतील व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. भारत व अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ व प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात येणार आहे. 
   अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ ही २००६ मध्ये स्थापना झालेली संस्था अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अर्थातच अ‍ॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे.

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे. हा कार्यक्रम ४ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅन अबॉर ,मिशीगन येथे होणार आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान करुन भारतीय नागरिक परेडमध्ये दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम दर्शन घडविणार आहे. जवळपास १०० भारतीय नागरिक या परेडसाठी अतोनात परिश्रम घेत आहेत व ही परेड यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. 
   काही दिवसांपूर्वी भारताच्या आर्थिक धोरणांवर नाराजी व्यक्त करतानाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, अमेरिकेत तयार होणारी एक प्रख्यात मोटारसायकल भारतात येते तेव्हा तिच्यावर शंभर टक्क्यांएवढे आयात शुल्क पूर्वी लावले जायचे. त्या
मुळे ती भारतीयांना दुप्पट भावाने विकत घ्यावी लागायची आणि अमेरिकेचा व्यापार घटून भारताच्या तिजोरीत मोठी भर पडायची. ही विषमता नाहीशी करण्याचा इशारा अमेरिकेने प्रथम दिला तेव्हा भारताने ते शुल्क ५० टक्क्यांवर आणले. पण अमेरिकेला तेही मान्य नाही. आम्ही तुमच्या मालावर आयात शुल्क लावत नाही म्हणून तुम्हीही ते लावायला नको, असे तिचे म्हणणे आहे व ते करणार नसाल तर आम्हालाही आवश्यक ती कारवाई करावी लागेल,असे ट्रम्प यांचे सांगणे आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका व भारत यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. परंतु, या बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बाब म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय असोसिएशनला सहभाग नोंदविण्याची संधी प्राप्त होत आहे. 
  ए२एमएएसचे संस्थापक संचालक भूषण कुलकर्णी म्हणाले, अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ हे अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे अ‍ॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान करुन भारतीय नागरिक परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम पाहण्याची संधी मिळणार आहे.
ही संस्था भारतीय मूळ असलेल्या लोकांनी, मराठी संस्कृती वृध्दिंगत व्हावी यासाठी स्थापन केली. भारतापासून दूर असूनही चालीरिती , सण , उत्सव , भाषा यांची नव्याने ओळख नव्या पिढील व्हावी . मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर पडावी त्यांचे व नातलगांची स्वागतच व्हावे सर्वांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी असे कार्यक्रम करणए ही सर्व संस्थेची उदिद्ष्टे आहेत. ए२एमएस ने २०१४ मध्ये एक मराठी शाळा सुरु केली. ज्याला मिशीगन शिक्षण विभागाकडून सील ऑफ बायलीटरसी मिळाले आहे. 

Web Title: marathi Culture will see in the parade of Independence Day America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.