१५ नोव्हेंबरपासून सोलापुरात मराठी नाट्य स्पर्धा
By Appasaheb.patil | Published: November 2, 2019 04:11 PM2019-11-02T16:11:30+5:302019-11-02T16:12:27+5:30
यंदाचे ५९ वे वर्ष : १७ संस्थांच्या नाटकांचे होणार सादरीकरण
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून सोलापुरात सुरुवात होणार आहे़ या स्पर्धा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडणार असल्याची माहिती समन्वयक ममता बोल्ली यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईच्या वतीने राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे ५९ वे वर्ष आहे़ १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता या स्पर्धा होणार आहेत. यात १७ संस्थांनी सहभाग नोंदविला आहे़ शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी झंकार सांस्कृतिक मंच, सोलापूर यांचा चाफा सुगंधी या नाटकाचे सादरीकरण होणार आहे़ लेखक नागेंद्र माणेकरी हे आहेत.
शनिवार १६ नोव्हेंबर रोजी स्वराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर यांचा लेखक डॉ. सलीम शेख लिखित फतवा, रविवार १७ नोव्हेंबर रोजी स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ, मानेगाव ता़ माढा यांचे समर्पण (लेखक - सपना बावळे), सोमवार १८ नोव्हेंबर रोजी सुस्नेह सांस्कृतिक मंडळ, कर्णिकनगर, सोलापूर यांचे भूमिका (लेखक - प्रल्हाद जाधव), मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी स्पोटर््स अॅडव्हेंचर अॅण्ड मल्टीपर्पज ट्रस्ट, सोलापूर यांचे आरोप (लेखक - सुरेश खरे), बुधवार २० नोव्हेंबर रोजी श्री प्रेरक फाउंडेशन कार्ला, जि़ लातूर यांचे एक गाव बारा भानगडी हे सुनीता गायकवाड लिखित नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
याशिवाय गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी शोध क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, कुर्डूवाडी यांचे अंत्यकथा (लेखक - प्रमोद खाडीलकर), शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी संकल्प युथ फाउंडेशन, मजरेवाडी, सोलापूर यांचे लाली (लेखक - कृष्णा विलास वाळके), शनिवार २३ नोव्हेंबर रोजी समर्पित फाउंडेशन यांचे जुईली मानकर (लेखक - रॉबिन लोपिस), रविवार २४ नोव्हेंबर रोजी कुर्डूवाडी युवक बिरादरी, कुर्डूवाडी यांचे काळोख देत हुंकार (लेखक - प्रा़ दिलीप परदेशी), सोमवार २५ नोव्हेंबर रोजी इंडियन आर्ट अॅकॅडमी, वैराग यांचे चखोत घास (लेखक - आनंद खरबस), मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्य मंडळ, सोलापूर यांचे या भुतांनो या..(लेखक - प्रल्हाद जाधव), बुधवार २७ नोव्हेंबर रोजी बनशंकरी बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांचे डबल डील (लेखक - विजय कटके), गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व कला मंच, कार्ला, जि़ लातूर यांचे स्वच्छता अभियान (लेखक - शाम जाधव), शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर यांचे अर्धांगिनी, शनिवार ३० नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूर यांचे वाचक (लेखक - प्रल्हाद जाधव), रविवार १ डिसेंबर रोजी अभयरत्न सामाजिक विकास संस्था, लातूर यांचे मलिक ले (लेखक-अक्षय संत) या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे़ या नाट्य स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक ममता बोल्ली यांनी केले आहे.