मराठी नाटय़ चळवळ सर्वश्रेष्ठ
By Admin | Published: June 26, 2014 10:59 PM2014-06-26T22:59:22+5:302014-06-26T22:59:22+5:30
‘‘नाटकाच्या निमित्ताने जगभरात ब:यापैकी फिरणो झाले आहे. जशी महाराष्ट्रात नाटकांची चळवळ आहे,
>पुणो : ‘‘नाटकाच्या निमित्ताने जगभरात ब:यापैकी फिरणो झाले आहे. जशी महाराष्ट्रात नाटकांची चळवळ आहे, तशी जगात कुठेच नाही. केवळ महाराष्ट्रातील दोन मोठी शहरे घेतली तरी मुंबईत उत्तम 12 नाटय़गृहे व पुण्यात 7 नाटय़गृहे आहेत. मराठी नाटय़ चळवळ सर्वश्रेष्ठ आहे,’’ असे मत ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना ‘बालगंधर्व पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. महापौर चंचला कोद्रे व मोघे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. 51 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी शिवराज वायचळ (दिग्दर्शन), सदाशिव कांबळे (वेशभूषा), गिरीश गोडबोले (बुकिंग), राजेश वाघ (प्रकाश योजना), श्रुती करंदीकर (गझलगायक) यांनाही सन्मानित करण्यात आले. मोघे म्हाणाले, ‘‘गायकाचा आत्मा गळ्यात आणि विचारात असतो, चित्रकाराचा डोळ्यात आणि हातात तसे नर्तकाचा आत्मा हा त्याच्या अणुरेणूंत असतो.’’
अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
बालगंधर्वाच्या गाण्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानेच मला भुरळ घातली आहे. त्यांच्याशी संबंधित काही तरी करण्याची फार इच्छा होती. म्हणूनच त्यांच्या रचनांवर आधारित नृत्याविष्कार मी साकारला. यामागे त्यांच्या पदांची गोडी सबंध महाराष्ट्राला लागावी, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा आणि त्यासाठी माङो लहानसे योगदान असावे, असा हेतू आहे.
- नंदकिशोर कपोते
..ते आपल्या
संगीत रंगभूमीवरील हीरा
4भौतिक विकास व सांस्कृतिक विकास हे देशाचे दोन डोळे असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘‘देशात जर सांस्कृतिक विकास नसेल, तर भौतिक विकासही मागे पडतो. यातील सर्वात मोठा वाटा बालगंधर्वाचा आहे, असे म्हणणोही वावगे ठरणार नाही. ते केवळ संगीत रंगभूमीवरीलच नव्हे, तर गद्य नाटकांमधीलही हिरा होते. सुरेल मैफलीत गायन व वादन जसे एकरूप झालेले असतात, तशी एकरूपता आपल्या लोकशाहीला आवश्यक आहे. सर्व पक्षांनी एकरूप होऊन विकासाची धोरणो आखायला हवीत.’’