मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार

By admin | Published: May 1, 2015 01:03 AM2015-05-01T01:03:18+5:302015-05-01T01:03:18+5:30

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे.

The Marathi Film Museum will be set up | मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार

मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार

Next

पुणे : चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे असले तरी घर विकून त्यांच्या कार्याला हातभार लावणा-या त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांचाही त्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवरच त्यांच्या नावाने मराठी चित्रपट संग्रहालय उभारण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी केली.
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ५२ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे,सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. तावडे यांनी दुर्मिळ मराठी चित्रपट,कथा,पटकथा, साहित्य असा चित्रपटांशी संबंधितअनमोल ठेवा जतन होण्याच्या दृष्टीने अशाप्रकारचे संग्रहालय निर्मित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सूर्यकांत लवांदे यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सिनेसंग्राहक नारायण फडके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राची लाडकी लेक झाले : विद्या बालन
शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे मी महाराष्ट्राची लाडकी लेक झाले आहे. मुंबइत लहानाची मोठी झाले त्यामुळे मराठी सिनेमाची आवड होतीच. यापूर्वी मी एका हिंदी चित्रपटात मराठी लावणी केली आहे. आता एक मराठी चित्रपट करणार असून त्या चित्रपटासाठी पुरस्कार मला मिळवायचा आहे, अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी व्यक्त केली.

आता आत्मपरिक्षण करण्याची गरज
आयुष्यातील पहिला पुरस्कार राज्य शासनातर्फे ’मुक्ता’या चित्रपटासाठी मिळाला. आता थोडेसे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे या पुरस्काराने सुचित केले असल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.

‘लोकमत’चा कार्यक्रम माझ्यासाठी लकी
‘गणवेश’ या आगामी चित्रपटावर ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘गप्पाटप्पां’मध्ये सायंकाळी दिलीप प्रभावळकर सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असतानाच प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. उपस्थित श्रोत्यांना कार्यक्रमातच ही बातमी देताना प्रभावळकर म्हणाले, ‘‘लोकमतचा कार्यक्रम माझ्यासाठी लकी ठरला. त्याचबरोबर लोकमतसोबत असलेल्या ‘मस्त पुणे’ टीममधील खेळाडू श्रुती मराठे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार्थी
४सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शन :
हॅप्पी जर्नी
४सर्वोत्कृष्ठ छायाचित्रण :
नागरिक
४सर्वोत्कृष्ठ संकलन :
हॅप्पी जर्नी
४सर्वोत्कृष्ठ ध्वनिमुद्रण :हॅप्पी जर्नी
४सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता : संदीप पाठक (एक हजाराची नोट)
४सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री : श्रृती मराठे (रमा माधव)
४सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता : दिलीप प्रभावळकर (पोश्टर बॉइज)
४सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेत्री :
वर्षा उसगावकर (हतूतू)
४सर्वोत्कृष्ठ बालकलाकार : आशुतोष गायकवाड
(काकण)
४सर्वोत्कृष्ठ कथा :मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी)
४सर्वोत्कृष्ठ पटकथा : मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी)
४सर्वोत्कृष्ठ संवाद :
महेश केळुस्कर (नागरिक)
४सर्वोत्कृष्ठ गीत :शाहीर संभाजी भगत (नागरिक)

Web Title: The Marathi Film Museum will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.