फेसबुकवर पोस्ट लिहून मराठी चित्रपट निर्मात्यांनी संपवली जीवनयात्रा

By Admin | Published: May 14, 2017 06:16 PM2017-05-14T18:16:31+5:302017-05-14T18:37:51+5:30

पुण्यातील एका चित्रपट निर्मात्यानंही पत्नीच्या जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे.

Marathi filmmakers ended their lives by writing post on Facebook | फेसबुकवर पोस्ट लिहून मराठी चित्रपट निर्मात्यांनी संपवली जीवनयात्रा

फेसबुकवर पोस्ट लिहून मराठी चित्रपट निर्मात्यांनी संपवली जीवनयात्रा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - ब-याचदा पतीच्या त्रासामुळे पत्नींच्या आत्महत्येचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महिलांबाबत कायदेही कठोर करण्यात आले आहेत. मात्र या कठोर कायद्याचा काही महिला गैरफायदा घेत असून, पतीला त्रास देत असल्याचंही अनेक प्रकार उघड झाले आहेत. पुण्यातील एका चित्रपट निर्मात्यानंही पत्नीच्या जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. "ढोल ताशे" या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर यांनी शनिवारी (ता.13) रात्री एरंडवणा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल प्रेसिडेंटच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे. रविवारी (ता.14) सकाळी 11 ते साडेअकराच्यादरम्यान तापकीर यांच्या खोलीत गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अतुल तापकीर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर या संदर्भात पोस्ट टाकली आहे. 
ती पोस्ट अशी आहे...
 
#नमस्कार_मित्रांनो_नक्की_वाचा
मी अतुल तापकीर आज तुमच्या बरोबर माझ्या आयुष्यातील एक गोष्ट facebook द्वारे share करत आहे.
मी ढोल ताशे हा चित्रपट काढला.
मी चित्रपट काढून व्यवसाय म्हणून हा चित्रपट केला.त्यात मला लॉस आला,मी निराश झालो पण या चित्रपटाने मला खूप मानसन्मान मिळवून दिला.चित्रपट लॉस ला जाऊन ही मला माझ्या वडिलांनी, बहिणींनी खचून नाही दिले,.मला हिम्मत दिली.मीही हिंमतीने जगू लागलो.
चित्रपट लॉस ला गेला मी थोडा कर्जबाजारी झालो म्हणून प्रियंकाने मला त्रास दयायला चालू केला,व्यवसायात होतो कधी कधी लॉस मलाही झाला.कोणाच्या घरात वादविवाद होत नाहीत माझ्याही घरात झाले पण प्रियंकाने हे समजून न घेता मला घरातून बाहेर काढले मी आजच्या दिवसापर्यंत 6 महिने झाले घरातून बाहेर राहतो आहे.मला माझ्या मुलांपासून दूर केले आणि माझ्यावर नाही तसले आरोप करून माझ्याबद्दल आमच्या परिसरातील लोकांना जाऊन घरोघरी जाऊन बदनामी करू लागली.आणि या गोष्टीचा गैरफायदा माझ्या काही मित्रांनीही घ्यायला चालू केला.मी रस्त्याने जात असताना मला थांबवून किंवा फोन करून छेडायला चालू केले जे आता मला सहन नाही होतेय.
येवड्यावरच न थांबता प्रियंकाने तिच्या मानलेल्या भावांना कल्याण गव्हाणे आणि बाळू गव्हाणे यांना मला मारायला लावले व त्यांना नंतर जेवणाची पार्टी दिली.यात यांना साथ तिचा मावस भाऊ बाप्पू थिगळे यानी दिली.व मला फोन करून वेळोवेळी धमकी दयायला चालू केले.
यातून प्रियंकाला हिम्मत मिळाली आणि ती माझ्या वडिलांना बहिणीला शिवीगाळ करू लागली.
पण तरीही मी सर्व विसरून काहीतरी चांगले व्हावे यासाठी घरगुती एक मिटिंग घेतली ज्यात हे ठरले की प्रियंका चा राग शांत होई पर्यंत ती वरच्या घरात राहील आणि तिला दर महिना 10000 हजार दयायचे ठरले, ज्यासाठी मी वोडाफोन स्टोर चे 5 हजार आणि पप्पा 5 हजार असे एकूण 10 हजार दयायला लागलो,ज्यातून तिचा आणि मुलांचा खर्च भागेल,
पण प्रिंयका ने या पैशातून नविन गाडी घेतली,
एकवेळचे जेवण नसले तरी चालेल पण टेन्शन नसावे,प्रियंका सारखा संशय घेत माझ्यावर आणि शिवीगाळ करू लागली,माझे जगणे मुश्किल करून टाकले, यातून मी दारूच्या आहारी गेलो जी दारू मी सोडली होती ती पुन्हा कधीतरी घेऊ लागलो.माझा संसार ज्या तिच्या भावांनी उदवस्त केला आहे,त्यांनाही मुलं मुली आहेत पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की जे माझ्याबरोबर घडले ते दिवस त्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कधीच येऊ नयेत..
मी 2 ते 3 दिवसापूर्वी प्रियंकाला फोन केला होता ज्यावेळी मी थोडी ड्रिंक केली होती आणि मी तिला वाईट बोललो शिवीगाळ केली,पण प्रियंकाने समजून न घेता मला उलट शिवीगाळ केली,माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केले हे मला आता सहन होत नव्हते म्हणून मी ड्रिंक केली,पण हे प्रियंका ने समजून घेतले असते की यांनी आता ड्रिंक केली आहे फोन बंद करावा आणि नंतर बोलावे ,पण तिने असे न करता माझ्या वडिलांच्या बहिणीच्या नावाने शिवीगाळ केली व माझी पोलिस चौकीत जाऊन complaint केली.आणि तिने या आधीही माझी आणि वडिलांची complaint करून आमची कशी बदनामी करता येईल हे पाहिले.
माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की जसे पोलिस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच बाजू पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे.त्यावेळी मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी 10 हजार मागितले आणि मी माझी बाजू स्पष्ट केल्यावर मला म्हणले की कळते आहे आम्हाला सर्व की तू बरोबर आहेस पण पहिली complaint तिने केली आहे म्हणजे तुम्हाला अटक करावी लागेल.आणि अटक होऊ नये म्हणून आम्ही 10 हजार देऊन शांत बसलो.10 हजार घेऊद्या पण त्यानंतर पोलिसांनी तिलाही रागावले पाहिजे होते..मी असे नाही म्हणत की सगळे पोलिस असे असतात.बरेच पोलीस माझे मित्र आहे ते खूप चांगले आहेत,पण मला जो अनुभव आला मी त्या पोलिसांबद्दलची माझी भूमिका मांडतो आहे..
पण पोलिसांनी तिला काहीच न बोलल्यामुळे तिला जास्त बळ मिळाले की कायदा हा हिच्या बाजूने आहे पण तरीही मी वडील शांत राहिलो कारण मुलांना भेटता येत नसले तरी कमीत कमी मुलं दारासमोर खेळतांना पाहून आम्ही समाधानी राहिचो,पण जर कधी मुलं घरात आलीच तर ही माझ्या मुलांना धमकी भरायची मारायची आणि खाली जाऊ नका असे सांगायची.त्यामुळे मुलं ही घाबरत तिला आणि खाली येत नसत..
मी नाही म्हणत की सर्वच महिला ह्या कायदाचा गैरवापर करतात पण प्रियंका सारख्या महिला हया या कायद्यांचा गैरवापर करून मानसिक छळ करतात सर्वच कुटुंबाचा..
प्रियंकाने कधीही माझ्या वडिलांची किंवा बहिणींची काळजी नाही घेतली तरी ती आमच्या दोघांच्या भांडणात त्यांना का शिव्या देत होती हेच नाही समजले..
माझी आई 10 वर्षा पूर्वीच आम्हाला सोडून गेली पण हिने तिलाही नाही सोडले तिच्याही नावाने शिव्या देऊ लागली.
माझ्या मुलाला जखम झाली होती नाकाला आणि हाताला जी पाहून अक्षरशः मला रडायला आले त्यावेळी मी त्याला घेऊन दवाखान्यात चाललो असताना मला प्रियंकाने शिवीगाळ केली आणि मुलाला दवाखान्यात नाही नेऊन दिले.व माझ्या मुलांना रस्त्यावर भीक मागायला लावणार आणि तापकीरांचे खानदान उदवस्त करणार असे बोलली जे आमच्या इथल्या सर्व लोकांनी ऐकले.
किती ही माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवणार त्यापेक्षा मेलेले बरे..
माझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशो आरामाची जिंदगी जगून दयावे. जी तिला हवी आहे....
तिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे..आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटो ही आहेत..
माझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशो आरामाची जिंदगी जगून दयावे. जी तिला हवी आहे....
तिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे..आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटो ही आहेत..
मी नाही जगू शकत टेन्शन मध्ये रोज रोज जगून मरण्यांपेक्षा एकदाच मेलेले बरे..
मी या आधीही आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता त्यावेळी प्रियंका बोलली होती की मरतो आहे तर मर पण मला त्रास नको देऊस, मला हेच नाही कळत की वाईट हिच्या मनात यायचे, घरातून मला बाहेर हिने काढले,मला माझ्या मुलांन पासून लांब हिने केले,माझी समाजात इज्जत हिने घालवली, मग मी हिला त्रास नक्की कधी दिला,जिला आपला नवरा आत्महत्या करतो आहे त्याचेही वाईट वाटत नव्हते तिला मी कसा काय त्रास देऊ शकतो..त्रास माझ्यामुळे झाला आहे माझ्या वडिलांना, घरच्यांना..कारण माझ्यामुळे त्यांना प्रियंकाच्या शिव्यापण सहन कराव्या लागत होत्या..माझा मानसिक छळ होत आहे..माझ्या नावाचे जे कासारंआंबोली मध्ये 2 फ्लॅट आहे ते माझ्या मुलाच्या नावे करावे जर ते माझ्यावडींलाच्याकडे राहणार असतीलतर आणि नसतील राहणार तर ते फ्लॅट माझ्या दोन्ही बहिणीच्या नावे करावे...
प्रियंकाच्या तीन चार मैत्रिणी आहेत गणेश नगर मध्ये ज्या तिला साथ देतात कारण त्यांना एखाद्याच्या घराचा तमाशा कसा होतो ते पाहायला मज्जा वाटते पण हे प्रियंका ला कधीच नाही समजले..खूप त्रास सहन केला पण आता नाही सहन होत ,या त्रास मुळे माझी मानसिकता सारखे जीवन संपवण्याकडे जाऊ लागली..म्हणून मी आज माझा जीवन प्रवास विष पिऊन संपवत आहे.विष प्यायची माझी हिम्मत नाही होत म्हणून आज परत मी drink करतो आहे...
पप्पा, माझी बहिण निर्मला, उज्वला,माझे लाडके संतोष दाजी,माझा मुलगा विश्वजित ,मुलगी साक्षी,माझी भाची आराध्या आणि भाचे वेदांत आणि युवराज,माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या आत्या ,त्यांच्या मुली,मुले आणि जावई आणि दाजींच्या घरचे तसेच आमचे वाड्यातील सर्व तापकीर, व सर्व नातेवाईक आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा मित्र परिवार यांची मी जाहीर माफी मागतो.
माझ्यामुळे ज्या कोणाला त्रास झाला असेल त्यासर्वानी मला मोठ्यामनाने माफ करावे..
तुमचा सर्वांचा लाडका पण तुम्हाला सर्वाना अर्ध्यातून सोडून तुमच्याबरोबर बेईमान झालेला तरीही तुमचाच असलेला..
पण एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की मी आता माझ्या आई बरोबर राहणार..
#अतुल_बाजीराव_तापकीर...
 
 दरम्यान, अतुल यांची पत्नी प्रियांका यांच्याशी त्यांचे वारंवार भांडणे होत होते. तसेच त्यांच्या पत्नीच्या भावांनी त्यांना मारहाण केल्याचेही नमूद केले आहे. याला कंटाळून अतुल यांनी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.
 

Web Title: Marathi filmmakers ended their lives by writing post on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.