बेळगाववर पुन्हा मराठी झेंडा

By Admin | Published: March 5, 2016 04:08 AM2016-03-05T04:08:26+5:302016-03-05T04:08:26+5:30

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे निवडून आले. हे दोघेही मराठी असून, यानिमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे

Marathi flags again at Belgaum | बेळगाववर पुन्हा मराठी झेंडा

बेळगाववर पुन्हा मराठी झेंडा

googlenewsNext

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे निवडून आले. हे दोघेही मराठी असून, यानिमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे.
या दोन्ही पदांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील यांना ३२, तर कन्नड उर्दू गटाच्या प्रतिस्पर्धी जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत संजय शिंदे यांना ३१, तर प्रतिस्पर्धी महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. मराठी भाषिक नगरसेवकांनी बेळगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन निवडणूक लढवली.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी काम पाहिले. निवडणुकीची प्रक्रिया सुरूझाल्यावर सकाळी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल करण्यात आले होते.
महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नगरसेवक पिंटू सिद्दकी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. ४ मराठी भाषिक नगरसेविकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विरोधी कन्नड, उर्दू गटाच्या अनुश्री देशपांडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी सरिता पाटील आणि जयश्री माळगी यांच्यात सरळ लढत झाली. उपमहापौरपदासाठी संजय शिंदे आणि विरोधी गटाचे महांतेश कागतीकर यांच्यात लढत झाली. शिंदे यांना ३१, तर महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. ऐनवेळी उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेल्या नागेश मंडोळकर यांनी उपमहापौर निवडणुकीत मतदान केले नाही.
महापौर आणि उपमहापौर यांची निवड जाहीर झाल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, आमदार फिरोज सेठ यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Marathi flags again at Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.