मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:08 PM2020-05-14T14:08:17+5:302020-05-14T14:12:39+5:30

गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते.

Marathi Grammarist Arun Phadke passes away vrd | मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

Next
ठळक मुद्देमराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे कर्करोगामुळे आज १४ मे रोजी नाशिक येथे निधन झाले. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे.

ठाणे : मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे कर्करोगामुळे आज १४ मे रोजी नाशिक येथे निधन झाले. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे.

अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेपासून समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले ऍपही लोकांना खूप उपयुक्त ठरते आहे. 

पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य सुरूच होते. वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात असलेले फडके सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून मुद्रितशोधन करू लागले. भाषेची आवड त्यांना पूर्वीपासून होतीच. त्यातूनच त्यांनी पुढे मराठी शुद्धलेखन या विषयाला वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. ते मूळचे ठाण्याचे होते. 

आज मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारे लोक बरेच असले, तरी ती शुद्ध (नियमानुसार) लिहिणारे किंवा तशा प्रकारे वापरणारे, वापरण्याची इच्छा असणारे लोक फारच कमी आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत जाते आहे. अशा परिस्थितीत अशा जाणकार, पथदर्शक आणि भाषेच्या सुयोग्य वापरासाठी झटणाऱ्या व्यक्तीचे जाणे खूप मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : ...तर कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही, WHOने दिला गंभीर इशारा

वाद पेटला! चीनची दक्षिण चिनी समुद्रातील 'त्या' भागावर ताबा घेण्याची धमकी; तैवान करणार युद्धाभ्यास

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

Web Title: Marathi Grammarist Arun Phadke passes away vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.