राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:14 PM2020-06-01T21:14:28+5:302020-06-01T21:30:32+5:30

राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Marathi language compulsory in all medium schools in the state, decision of Thackeray government vrd | राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

Next

मुंबईः राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्यात आला आहे. अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात पहिली ते दहावीचा विचार करता राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व शाळांमध्ये मराठीचा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी तसेच केंब्रिज यांसारख्या अन्य मंडळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येत असल्यानं या मंडळांच्या भाषा विषय योजनेत द्वितीय अथवा तृतीय भाषा म्हणून मराठीचा पर्याय उपलब्ध असतो. परंतु बऱ्याच शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन-अध्यापनामध्ये दिला जात नाही. तसेच मराठी हा विषय अनिवार्य नसल्याचं दिसून येतं, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अशा शाळांना मराठी विषय न शिकवल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. 

राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व सक्तीचा करण्यात आला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
 

Web Title: Marathi language compulsory in all medium schools in the state, decision of Thackeray government vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी