गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा !
By admin | Published: July 29, 2016 08:25 PM2016-07-29T20:25:12+5:302016-07-29T20:25:12+5:30
मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, असा ठराव दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.
Next
गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा ठराव दक्षिण गोवा जिल्हा पंचायत बैठकीत संमत
मडगाव : मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, असा ठराव दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. राजभाषा कायद्यात रोमी लिपीलाही मान्यता दिली, तरी हरकत नाही, असाही ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष नवनाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सदस्य मोहन वेरेकर यांनी हा ठराव मांडला.