मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
By Admin | Published: February 28, 2016 03:35 AM2016-02-28T03:35:21+5:302016-02-28T03:35:21+5:30
ष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी शहर-उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्य शासनाप्रमाणेच
मुंबई : ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी शहर-उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्य शासनाप्रमाणेच शाळा, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. एरव्ही ‘डे’ सेलीब्रेट करण्याची संस्कृती जपणारी तरुण पिढीही याला अपवाद ठरली नाही.
जोगेश्वरीत आयोजित ग्रंथमहोत्सवात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. या ग्रंथमहोत्सवाची सुरुवात श्रमिक विद्यालय, बांदिवली विद्यालय, बालविकास विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडीने करण्यात आली. या वेळी शाखा क्र. ६८ चे नगरसेवक अनंत (बाळा) नर, नगरसेवक जितेंद्र वळवी, विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, साधना माने, अनंत भोसले, आयडियल बुक डेपोचे मालक मंदार नेरुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. दादर येथील आयडिल बुक डेपो आणि अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्यातर्फे ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नव्याने प्रकाशित करण्यात आलेली पुस्तकेही ठेवण्यात आली असून ही पुस्तके माफक दरात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेसतर्फे साहित्य, संगीत संस्कृती, एकपात्री आविष्कार, कथा, कविता इत्यादी कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहाने राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. बोरीवली येथील बी. के. कृष्णा मेनन अॅकॅ डमीमध्ये मल्याळी भाषेतील विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला, तर जोगेश्वरी येथील फारुक गर्ल्स हायस्कूलमध्ये उर्दू मुलांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी राजभाषा दिन आवर्जून साजरा करण्यात आला.
विलेपार्ले येथील माधवराव भागवत महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या मराठी वाङ्मय विभागातर्फे ‘गीत गाईन नवे’ या संगीताचे सादरीकरण करण्यात आले.माहीम सार्वजनिक वाचनालयात ‘मराठी नाटकातलं आणि नाटकाबाहेर’ या अनोख्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला. अंधेरीतील अरुणोदय प्रतिष्ठानतर्फे ‘आला रे आला’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि समर्थ ग्रंथालयाच्या वतीने कविता वाचनाचा कार्यक्रम करण्यात आला.
‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा झाला. उपनगरी रेल्वे स्थानकांवर दिवसभर मराठी अभिमान गीत वाजविण्यात येत होते. राज्य शासनाप्रमाणेच शाळा, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.