'अज्ञानी' पासून 'ज्ञानी' बनवणारी मराठी एकमात्र भाषा - अमिताभनी गायले मराठीचे गोडवे

By admin | Published: February 27, 2017 12:26 PM2017-02-27T12:26:17+5:302017-02-27T12:29:22+5:30

मराठी भाषा दिनानिमित्त खास ट्विट करत अमिताभ बच्चननी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Marathi is the only language to create 'Gnani' from 'ignorant' - Amitabhni Gayle | 'अज्ञानी' पासून 'ज्ञानी' बनवणारी मराठी एकमात्र भाषा - अमिताभनी गायले मराठीचे गोडवे

'अज्ञानी' पासून 'ज्ञानी' बनवणारी मराठी एकमात्र भाषा - अमिताभनी गायले मराठीचे गोडवे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मराठीला तिच्या वैभवाची प्रखर जाणीव करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसमाग्रज यांचा आज जन्मदिन आणि हाच दिवस ' मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 
यानिमित्त बॉलिवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही सर्वांना खास शुभेच्छा दिल्या असून ' अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी बनवणारी मराठी ही विश्वातील एकमेव भाषा आहे' असे गौरवपूर्ण उद्गार बच्चन यांनी काढले आहेत. बिग बींनी ट्विटर एक खास संदेश पोस्ट करत मराठीचे गोडवे गायले आहेत. 
' इंग्रजी मध्ये 'A' फॉर *Apple* ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर *Zebra* वर येऊन संपते.शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते. पण मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला 'अ' म्हणजे *"अज्ञानी"* पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच *"ज्ञानी"* बनवते'. ' मुजरा त्या मराठी भाषेला' असे सांगत बिग बींनी 'मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' दिल्या आहेत.
  

Web Title: Marathi is the only language to create 'Gnani' from 'ignorant' - Amitabhni Gayle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.