गोव्यात मराठीप्रेमींचा निर्धार मेळावा
By Admin | Published: November 2, 2016 08:01 PM2016-11-02T20:01:16+5:302016-11-02T20:01:16+5:30
गोव्यातील हजारो मराठीप्रेमी येत्या 13 रोजी पणजीत एकत्र येणार आहेत. सरकारने येत्या निवडणुकीपूर्वी मराठीला राज्येभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी करण्यासाठी
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 02 - गोव्यातील हजारो मराठीप्रेमी येत्या 13 रोजी पणजीत एकत्र येणार आहेत. सरकारने येत्या निवडणुकीपूर्वी मराठीला राजभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी करण्यासाठी हा निर्धार मेळावा निश्चित करण्यात आला आहे.
मराठी राजभाषा समितीतर्फे गो. रा. ढवळीकर, माजी आमदार मोहन आमशेकर, माजी महापौर अशोक नाईक, निर्धार मेळाव्याचे प्रमुख कार्यवाही मंगेश कुंडईकर, युवा अध्यक्ष मच्छींद्र च्यारी आदींनी येथे पत्रकार परिषदेत मेळाव्याबाबत माहिती दिली. सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेऊन मराठी राजभाषेसंबंधी जागृती करण्यात आली आहे. सर्व तालुक्यांमध्ये संपर्क प्रमुखही नेमण्यात आले आहेत. महिला व युवा समितीही नेमण्यात आली आहे. मराठीच्या चळवळीतील विविध संस्था, संघटना, संप्रदाय यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी सरकारवर दबाव यायला हवा. यासाठी पणजीत शक्ती प्रदर्शन केले जाईल, असे कुंडईकर, आमशेकर व इतरांनी सांगितले. भारतीय भाषा सुरक्षा मंचनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे. त्यांनीही निर्धार मेळाव्यात भाग घ्यावा, असे आवाहन ढवळीकर यांनी केले. आमच्यासारखे अनेकजण भाषा सुरक्षा मंचसोबत होते. गोवा सुरक्षा मंचने आपल्या निवडणुक जाहिरनाम्यात मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या आश्वासनाचा समावेश करावा, अशी मागणी आमशेकर यांनी केली. मराठी राजभाषा समिती व भाषा सुरक्षा मंच या दोन भिन्न संघटना आहेत. मराठीला राजभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी भाषा सुरक्षा मंच करत नाही. उलट त्या मागणीशी आपल्याला काही देणोघेणो नाही असे भाषा सुरक्षा मंचने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे आपल्यासह अन्य काहीजणांनी भाषा मंचशी फारकत घेतली. आमची मागणी व भाषा सुरक्षा मंचची मागणी यात फरक आहे, असे मच्छींद्र च्यारी यांनी सांगितले.
आझाद मैदानावर निर्धार मेळावा घेण्याचे आम्ही निश्चित करून लेखी परवानगीही घेतली. त्यानंतर सरकारी यंत्रणोने आझाद मैदान फोडलेले आहे. तथापि, पणजीतच निर्धार मेळावा पार पडेल, असे कुंडईकर यांनी सांगितले.
पंतप्रधानही 13 रोजीच गोव्यात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम येत्या 13 रोजी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. मोपा विमानतळ प्रकल्प व तुयें येथील इलेक्ट्रॉनिक सिटी या दोन प्रकल्पांसाठी पायाभरणी सोहळा या सभागृहात पार पडेल. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली व पंतप्रधानांच्या भेटीचा कार्यक्रम निश्चित केला.