‘हुसैनीवाला’शी जुळले आहे मराठी नाते; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:15 AM2022-01-07T06:15:06+5:302022-01-07T06:15:13+5:30
हुसैनीवाला या गावातील सतलज नदीच्या काठावर शहीद भगतसिंग, शिवराम राजगुरू व सुखदेव यांच्यावर २३ मार्च १९३१ राेजी अंत्यसंस्कार करण्यात आले हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील सतलज नदीच्या काठावर वसलेल्या हुसैनीवाला या गावाशी मराठी नाते जु्ळलेले आहे. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या राेषाला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना सामाेरे जावे लागल्याने हे चिमुकले गाव प्रसिद्धीस आले आहे.
हुसैनीवाला या गावातील सतलज नदीच्या काठावर शहीद भगतसिंग, शिवराम राजगुरू व सुखदेव यांच्यावर २३ मार्च १९३१ राेजी अंत्यसंस्कार करण्यात आले हाेते. भारतमातेच्या या वीरांचा यथाेचित गाैरव करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय शहीद स्मारक उभारले आहे. यालाच हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक म्हटले जाते.
शहीद भगतसिंग व सुखदेव यांच्यासाेबत शिवराम राजगुरू या मराठी मातीत जन्मलेल्या क्रांतिकारकाला २३ मार्च १९३१ राेजी इंग्रजांनी लाहाेरच्या कारागृहात फाशी दिली. लाहाेरमधील लाेकांचा राेष वाढेल यामुळे इंग्रजांनी जेलच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून मागच्या दाराने या तिन्ही वीरांचे मृतदेह हुसैनीवाला येथे आणले. तेथेच सतलज नदीच्या काठावर अंत्यत गुप्तपणे अंत्यसंस्कार उरकलेे. देशाच्या विभाजनानंतर मात्र हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात गेले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेऊन हे गाव १९६१ मध्ये भारतात सामील केले.