फेसबुकवर मराठी युजर्स होताहेत ’अ‍ॅक्टिव्ह’: मुंबईत सर्वाधिक फेसबुक युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:00 AM2018-11-19T07:00:00+5:302018-11-19T07:00:01+5:30

फेसबुक वापरात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय आहे.

Marathi users 'active' on Facebook : Mumbai's top in Facebook users | फेसबुकवर मराठी युजर्स होताहेत ’अ‍ॅक्टिव्ह’: मुंबईत सर्वाधिक फेसबुक युजर्स

फेसबुकवर मराठी युजर्स होताहेत ’अ‍ॅक्टिव्ह’: मुंबईत सर्वाधिक फेसबुक युजर्स

Next
ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण हे सर्वाधिक, पुणे तिस-या क्रमांकावर ’शहरनिहाय सोशल मीडिया वापरकर्ते आणि मराठी भाषिक यांचा तुलनात्मक अभ्यास’अनेक फेसबुक वापरकर्त्यांना देवनागरी भाषेत लिहिणे जमत नाही. 

पुणे : अन्न, वस्त्र,निवारा यांबरोबरच सोशल माध्यमे देखील जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. यात प्रामुख्याने व्हाटस अ‍ॅप आणि फेसबुकचा समावेश सर्वाधिक आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातील एकूण फेसबुक वापरकर्त्यांपैकी ४० टक्के व्यक्ती या मराठी भाषिक फेसबुकवर सक्रिय आहेत.शहरनिहाय फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह असणा-या मराठी भाषिकांचा केलेल्या एका सर्वेक्षणानुसार औरंगाबाद हे शहर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.या शहरात फेसबुक वापरणा-या व्यक्तींची संख्या ८.१० लाख असून त्यापैकी फेसबुक वापरणा-या मराठी भाषिकांची संख्या ५.९० लाख इतकी असून त्याची टक्केवारी ७२. ८४ आहे. 
  सामाजिक माध्यमे आणि जनसंज्ञापन या विषयाचे अभ्यासक व्यंकटेश कल्याणकर यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातुन ही माहिती समोर आली आहे. त्यांनी ’’शहरनिहाय सोशल मीडिया वापरकर्ते आणि मराठी भाषिक यांचा तुलनात्मक अभ्यास’’या विषयावर संशोधन केले असताना त्यातून वेगवेगळे निष्कर्ष हाती आले आहेत. या संशोधनात राज्यातील काही प्रमुख शहरांमधील मराठी भाषा अवगत असणा-या फेसबुक वापरकर्त्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केला गेला. या अभ्यासाकरिता फेसबुकवर सशुल्क जाहिरात (पेड अ‍ॅडव्हरटायझमेंट) करताना मिळणा-या ‘‘पोंटेशियल रिच’’ या सुविधेचा वापर करण्यात आला. संशोधनानुसार मुंबईतील एकूण फेसबुक वापरकर्त्यांच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी वापरकर्ते हे मराठी भाषिक आहेत. तसेच इतर चार शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. पुण्यातील ४४ टक्क्यांपेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते हे अमराठी आहेत. तर मुंबईनंतर सर्वाधिक अमराठी भाषिक नागपूरमध्ये त्यापाठोपाठ पुण्यात असल्याचे दिसून आले आहे. 
 मराठी फेसबुक वापरकर्ता हे अचुकपणे शोधून काढण्याकरिता एखाद्या फेसबुक वापरकर्त्याने आपली ओळख कुठल्या भाषेच्या माध्यमातून केली आहे, तसेच त्याने कुठल्या मराठी वृत्तपत्रांना, मराठी वेबसाईटला आपली पसंती दर्शविली आहे, फेसबुकवर कार्यरत असणा-या किती मराठी अँप्लिकेशन्स आणि पोस्टला त्याच्याकडून पसंती मिळाली आहे, हे मुद्दे विचारात घेतले गेले आहेत. फेसबुकने ही सर्व माहिती त्यांच्या ग्राहकांकरिता उपलब्ध करुन दिली असून त्यांनी नमुद केलेल्या अटींचे पालन केल्यास वापरकर्त्याला संंबंधित सुविधेचा लाभ घेता येतो. यामुळे ही सर्व माहिती व आकडेवारी पूर्णत: विश्वासार्ह असल्याचे कल्याणकर यांनी म्हटले आहे. 
.................................................................
 - संशोधनातून हाती आलेले नित्कर्ष 
 - फेसबुक वापरात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय आहे.
 - बहुतेक मराठी फेसबुक वापरकर्त्यांना आपली सक्रियता मराठीतून दाखवावी याची जाणीवच नाही.
 -  अनेक फेसबुक वापरकर्त्यांना देवनागरी भाषेत लिहिणे जमत नाही. 
 - सोशल माध्यमांविषयी अधिक प्रभावीपणे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अद्यापही त्याबाबत अज्ञान पाहवयास मिळते. 
................................................
* शहरनिहाय एकूण फेसबुक वापरकर्ते आणि मराठी भाषिक यांची आकडेवारी (यात वय वर्षे 18 ते 65 पर्यंतचे फेसबुक वापरकर्ते विचारात घेतले आहेत.) 

शहर                फेसबुक वापरकर्ते             मराठी भाषिक          टक्केवारी 
मुंबई                130 लाख                      39 लाख                30.00 %                
पुणे                   58 लाख                      32 लाख                 55.17 %      
नाशिक              9. 30 लाख                  6.70 लाख              72.04 %
नागपूर              19 लाख                        8.60 लाख             45.26 %
औरंगाबाद         8.10 लाख                    5.90 लाख              72.84 %

Web Title: Marathi users 'active' on Facebook : Mumbai's top in Facebook users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.