मराठवाड्यात अवकाळी!

By admin | Published: June 5, 2016 12:44 AM2016-06-05T00:44:21+5:302016-06-05T00:44:21+5:30

मराठवाड्यात बहुतांश भागात शनिवारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. वीज अंगावर पडून बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात दोन ठार, पाच जखमी तसेच उस्मानाबाद

Marathwada! | मराठवाड्यात अवकाळी!

मराठवाड्यात अवकाळी!

Next

औरंगाबाद : मराठवाड्यात बहुतांश भागात शनिवारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. वीज अंगावर पडून बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात दोन ठार, पाच जखमी तसेच उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात प्रत्येक एक असे चार जण ठार झाले. वीज कोसळल्याने उस्मानाबाद शहराजवळील एका पोल्टीफॉर्ममधील ५०० कोंबड्या दगावल्या. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पेट्रोल पंपाचे छत उडाले.
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील वांगी येथे वीज पडून गणेश ग्यानबा जाधव (४५) हे जागीच मृत्युमुखी पडले तर अंगद श्रीरंग मोहिते (४०), रतन विठ्ठल जाधव (३५) दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. याच तालुक्यातील गोविंदवाडी येथे वाऱ्याने उडालेल्या पत्र्यामुळे मान कापून बळीराम संपती जाधवर (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यावेळी सिंधू गोपीनाथ मुंडे, विठ्ठल निवृत्ती चाटे, रामचंद्र तिडके हे तिघे जखमी झाले. याशिवाय अंबाजोगाई, धारूर, गेवराई, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार व परळी या तालुक्यांमध्ये सर्वदूर पावसाचे आगमन झाले.गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील शेतकरी वसंत हरकटे यांच्या शेतातील गायीच्या अंगावर वीज पडून ती दगावल्याची घटना घडली.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली़ शहरानजीक वैराग रोडवरील पोल्ट्रीफार्मवर वीज पडल्याने इलियास महेबूब शेख (वय-५२) यांचा मृत्यू झाला़ परभणी जिल्ह्यातील धसाडी येथे वीज पडून शोभा तुकाराम शिंदे (वय २७) या महिलेचा मृत्यू झाला़ उदगीर, अहमदपूर, निलंगा चाकूर, औसा, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि रेणापूर तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस झाला. या पावसामुळे वळसंगी नदीला पाणी आले असून, ओढे, नाले वाहत आहेत़ (प्रतिनिधी)

मुसळधार पाऊस, वादळ आणि वारा
- लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पेट्रोल पंपाचे छत उडाले. या पावसामुळे वळसंगी नदीला पाणी आले असून, ओढे, नाले वाहत आहेत़ जालना शहरासह जिल्ह्यातील अंबड, बदनापूर मंठा आणि घनसावंगी तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.

Web Title: Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.