‘समृद्धी’चा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला- देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:54 AM2017-10-08T00:54:29+5:302017-10-08T00:54:39+5:30
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यालाच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
मुंबई : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यालाच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
मराठवाडा लोकविकास मंच यांच्यावतीने मराठावाडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत
होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, ज्येष्ठ पत्रकारराही भिडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, उद्योजक राम भोगले, अभिनेते गिरीश कुलकर्णी, आ. डॉ. भारती लव्हेकर, नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे, ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अजय मुनोत, उदयोन्मुख प्रशासकीय अधिकारी अन्सार शेख यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पाटेकर, अनासपुरे यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.
मराठवाड्याने राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशंसोद्गार काढले.
विधानसभा अध्यक्ष बागडे, पंकजा मुंडे यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचीही भाषणे झाली.
औरंगाबादला मंत्रिमंडळ बैठक
- तीन ते चार महिन्यांत पुन्हा औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे नियोजन
आहे. पहिली औद्योगिक स्मार्ट-सिटी ही मराठवाड्यातच नियोजित आहे. त्याद्वारे
साडेतीन लाख रोजगार
निर्मिती होईल. मराठवाड्याच्या विकासाला चालना
देण्यासाठी टुरीझम क्लस्टर संकल्पना राबविणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.