मराठवाडा स्वतंत्र हवा
By admin | Published: January 31, 2016 01:41 AM2016-01-31T01:41:02+5:302016-01-31T01:41:02+5:30
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मराठवाड्याची सध्याची स्थिती पाहता विदर्भाआधी खरे तर वेगळ्या मराठवाड्याची गरज आहे.
अहमदनगर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मराठवाड्याची सध्याची स्थिती पाहता विदर्भाआधी खरे तर वेगळ्या मराठवाड्याची गरज आहे. त्यांच्या प्रांतातून बरेच मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्याकडून काही विशेष प्रयत्न झाले नाहीत. विदर्भाकडून बोलण्याचे धाडस आमच्यासारखे करत आहेत, असे सांगत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला.
येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्रासाठी ते आले होते. वेगळ्या विदर्भाबाबत तुम्ही व्यक्त केलेल्या मतामुळे शिवसेनेसह
विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले असल्याकडे लक्ष वेधले
असता ते म्हणाले, स्वतंत्र राज्य निर्मितीचा विषय केंद्राच्या अखत्यारितील आहे. त्यासाठी सरकारचा पाठपुरावा आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक विरोधक काय म्हणतात, त्याला अर्थ नाही. मी माझी भावना व्यक्त केली, ते त्यांची व्यक्त करतात. निर्णय तर केंद्राकडून अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
न्यायालयीन प्रक्रिया वकिलांनीच सोपी करावी
सरकारी वकील, न्यायाधीशांची कमतरता आहे, ही गोष्ट खरी असली, तरी त्यातून उपाय काढण्यासाठी वकिलांनाच पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही अणे यांनी सांगितले.