मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

By Admin | Published: April 26, 2016 07:20 PM2016-04-26T19:20:20+5:302016-04-26T19:20:20+5:30

गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल

Marathwada not Tankarwada ....! | मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

googlenewsNext

नामदेव कुंभार
मुंबई, दि. २६ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. लातूरमध्ये मोठय़ा प्रमाणात त्याच्या झळा बसत असल्याने सरकारने मालगाडीतून या जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धातळीवर सुरु आहे. दुष्काळ कोणालाही आवडत नाही. पण गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. लातूरसह मराठवाड्यातील लोक आज भीषण दुष्काळला सामोरं जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल. मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे चित्र लोकमतचे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या छायाचित्रामार्फत आपणास दुष्काळाचे चित्र दिसेल.



या वर्षी दुष्काळाची तीव्रता कमालीची आहे. राज्यात १७, मराठवाड्यात फक्त तीन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या अनेक घटनांच्या मध्यभागी मराठवाडा (नव्हे टँकरवाडा!) उभा आहे.



गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत


गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे.



राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे.


मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर.

हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.


सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने यंदा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात सध्या फक्त ३ टक्के पाणी आहे. पाणीकपात असल्यामुळे कुटुंबातील काही महिलांना नाल्यातून वाहणाऱया पाण्यात कपडे धुवावे लागत आहेत.

दुष्काळ कोणालाही आवडत नाही. तो कोरडा असो वा ओला. या दोन्ही दुष्काळात शेतकरी पुरता नाडला जातो. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या नशिबी येते ती हताशा. ती व्यक्त करण्याचे मार्ग मिळाले नाहीत.

आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. राज्यात गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारित शेतीची पार वाट लागलेली आहे

 

Web Title: Marathwada not Tankarwada ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.