महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात राबविणार

By admin | Published: January 10, 2016 12:50 AM2016-01-10T00:50:57+5:302016-01-10T00:50:57+5:30

एखादा आजार झाल्यास आर्थिक विवंचनेत सापडतात. त्यांना आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य उपक्रम राबविला

In the Marathwada, the pattern of the Medical Camp will be implemented | महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात राबविणार

महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात राबविणार

Next

जळगाव : एखादा आजार झाल्यास आर्थिक विवंचनेत सापडतात. त्यांना आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य उपक्रम राबविला असून मराठवाड्यातही जळगाव पॅटर्न राबविला जाईल. त्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य अल्पसंख्याक विकास आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदींच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबीर झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाजन हे आरोग्यदूत आहेत. जळगावमध्ये त्यांनी शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणले. आरोग्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी महाजन यांच्या रुपाने आमच्याकडे पॅरलल (समांतर) आरोग्य मंत्रालय आहे, असे फडणवीस म्हणाले. पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रणजित चव्हाण म्हणाले, गरजवंत रुग्णांनी मोफत उपचारासाठी माझ्याकडे यावे. वर्षभरात मी ६०० मोफत एन्जिओप्लास्टी करतो. जी. एम. फाउंडेशन व रेडक्रॉस यांच्यात १,२०० रुपयांची रक्तपिशवी २०० रुपयांत रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा करार झाला.
कॉर्पोरेट क्षेत्र व शासन यांच्या मदतीने खूप मोठे काम महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. बीडमध्ये मी असेच शिबीर घेईन, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर गिरीश महाजन हे राजकारणातील साधू आहे. सत्तेत नसतानाही त्यांचे काम सुरू होते, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)

महाआरोग्य शिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही विविध योजनांच्या माध्यमातून एन्जिओप्लास्टी विनामूल्य कशी होईल, त्यासाठी लागणारी स्टेण्ट मोफत उपलब्ध करण्यासाठी तरतूद करील.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

Web Title: In the Marathwada, the pattern of the Medical Camp will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.