मराठावाडा साहित्य संमेलन: उद्या कोठे काय.... 25 डिसेंबर रोजीचे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 01:32 PM2017-12-24T13:32:37+5:302017-12-24T13:39:22+5:30
दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे.
अंबाजोगाई : उद्या (दि.24) संमेलनाच्या दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता स्वामी रामानंद सभागृह येथे प्रख्यात साहित्यीक चंद्रकांत पाटील यांच्या प्रकट मुलाखतीने होणार असून रणधीर शिंदे (कोल्हापूर), आसाराम लोमटे (परभणी), आणि तुषार बोडखे (औरंगाबाद) हे त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर सकाळी ११ वाजता याच सभागृहात "ग्रामीण शिक्षण : समस्या आणि उपाय" या विषयावरील परिसंवाद होणार असून या परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणाचे अभ्यासक प्राचार्य जनार्दन वाघमारे हे राहणार असून या परिसंवादात पुरुषोत्तम भापकर (औरंगाबाद), नंदकुमार नेत्रम वर्मा (मुंबई),कुलगुरू बी.एश. चोपडे (औरंगाबाद), गोविंद नांदडे (पुणे), डॉ. सुरेश खुरसाळे (अंबाजोगाई) आणि अमर हबीब (अंबाजोगाई) यांचा सहभाग राहणार आहे. या परिसंवादाचे प्रास्ताविक शशीकांत हिंगोणेकर हे करणार आहेत.
दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. या परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा. भास्कर चंदनशीव हे राहणार आहेत तर प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव (परभणी), ज्योती कदम (नांदेड), प्राजक्ता सोनवणे (केज), रुषीता लाहोटी (गेवराई) आणि प्रकाश भुते (गेवराई) हे सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचे संचालन विविध शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनामुळे सतत चर्चीत असलेल्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या करणार आहेत तर आभार मुजीब काजी हे मानणार आहेत.
दुपारी २ वाजता "गझल संमेलन" या अभिनव उपक्रमाचे आयोजन भगवानराव लोमटे सभागृहात करण्यात आले असून या गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील प्रख्यात गझलकार डॉ. इकबाल मिन्ने हे राहणार असून मराठवाड्यातील ३३ प्रतिथयश गझलकारांसह इलाही जमादार (पुणे), वैभव जोशी (पुणे), राधा भावे (गोवा), चित्तरंजन भट (पुणे) या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.
दुपारी २ वाजता सर्वद्न्य दासोपंत सभागृहात
" मराठवाड्याच नाटक : काल आणि आज" या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून प्रख्यात नाट्यकर्मी प्रा. केशल देशपांडे हे या परिसंवादाच्या अध्यक्षतेस्थानी राहतील. या परिसंवादात दिलीप घारे(औरंगाबाद), प्रकाश त्रिभुवन (औरंगाबाद), रविंद्रकुमार झिंगरे ( परभणी), स्वाती देशपांडे (औरंगाबाद) आणि सतीष साळुंके (बीड) यांचा सहभाग राहणार आहे.
सायंकाळी ४ वाजता याच सभागृहात "कवींची वाढती संख्या बाळसं की सुज !" या विषयावरील परिसंवाद प्रख्यात कवी डॉ. केशव तुपे (औरंगाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या परिसंवादात डॉ. राजशेखर शिंदे (सोलापूर), कृष्णा किंबहुणे (मुंबई), सुरेशकुमार वैराळकर (पुणे), संजिवणी तडेगांवकर (जालना), पी. विठ्ठल (नांदेड), समिता जाधव (औरंगाबाद) आणि रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा सहभाग राहणार आहे.
सायंकाळी सहा वाजता भगवानराव लोमटे सभागृहात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष दैनिक सकाळ (औरंगाबाद) आवृत्तीचे संपादक संजय वरकड हे राहणार असून यामध्ये मराठवाड्यातील निमंत्रित कवींचा सहभाग राहणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचे सुप वाजणार आहे.