येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:11 PM2017-09-19T20:11:54+5:302017-09-19T20:12:34+5:30

कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़.  येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला

Marathwada, Vidarbha hint of extreme rain in next 24 hours | येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

Next

पुणे, दि. 19 : कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़.  येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला आहे़ हर्णे येथे गेल्या ३२ तासात तब्बल ५२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

अरबी समुद्रात दक्षिण गुजरात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून गोवा ते कर्नाटक किनारपट्टी परिसरात हवेचा कुंड तयार झाला आहे़ त्याचा परिणाम होऊन कोकण, गोवा, गुजरात परिसरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे़ त्याचवेळी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, झारखंड, छत्तीसगड, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालंड, मणीपूर, मेझोराम, त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात दोडामार्ग, महाड, पणजी, रामेश्वर, रत्नागिरी, साकेलम, वैभववाडी ९०, खेड ८०, डहाणु, देवगड, लांजा ७०, फोंडा, वाल्मोई ६०, अलिबाग, दाभोलीम, माणगाव, श्रीवर्धन ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़
मध्य महाराष्ट्रात राधानगरी, साक्री ७०, आजरा, चांदगड, पन्हाळा, सिन्नर ५०, जावळी, मेधा, पाटण, वेल्हे ४०मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात फुलंब्री, सिल्लोड २०, भोकरदन, सोलेगाव १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात मूलचेरा ५०, मौदा ४०, नागभीर ३०, बार्शी टाकळी २०, अकोला, बल्लारपूर, चिखलदरा, कामठी, मोटाळा, नांदगाव, काजी, पाटुर, सालेकसा, सिरौंचा १० मिमी पाऊस पडला़
मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत (कुलाबा) तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सांताक्रुझला ३५, अलिबाग ३१, रत्नागिरी ९३, पणजी ७, डहाणु ९, महाबळेश्वर ९३, पुणे १९़८, कोल्हापूर ६, सांगली २, सातारा २९, गोंदिया २, नागपूर ०़४, यवतमाळ ४४ मिमी पावसाची नोंद झाली होती़

येत्या २४ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ २१ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

हर्णे येथे सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ या २४ तासात तब्बल ३७३ मिमी पावसाची नोंद झाली़ दर तीन तासांनी पडलेला पाऊस, सकाळी ८़३० - ६८, सकाळी ११़३० - ११, दुपारी १४़३० - १३२, सायंकाळी १७़३० - १५५़८, रात्री २०़३० - १५९़८, रात्री २३़३० - १६०़८, पहाटे २़३० - १६३, सकाळी ५़३० - २१३, सकाळी ८़३० - ३७३ मिमी

हर्णे येथे मंगळवार सकाळपर्यंत ३७३ मिमी आणि सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५६ मिमी पाऊस झाला आहे़ मागील ३२ तासात ५२९ मिमी पाऊस झाला आहे़

हर्णे येथे सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच पर्यंत १२१ मिमी पाऊस पडला

मंगळवारी सकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत या तीन तासात १६० मिमी पाऊस झाला़
सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सायंकाळी साडेपाच या ३२ तासात महाबळेश्वर येथे २१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

मंगळवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिमी)
हर्णे ३७३, वाकवली २९०, दापोली २६०, चिपळूण २२०, मूलडे १८०, कणकवली, मंडणगड १४०, मालवण १३०, राजापूर १२०, गुहागर, पेडणे, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, वेंगुर्ला ११०, म्हापसा १००, महाबळेश्वर १२०, गगनबावडा १००

Web Title: Marathwada, Vidarbha hint of extreme rain in next 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.