शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार
By पोपट केशव पवार | Updated: March 1, 2025 14:21 IST2025-03-01T14:21:48+5:302025-03-01T14:21:58+5:30
कोल्हापूर : पिकाऊ शेतजमिनी उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येत्या १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात ...

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार
कोल्हापूर : पिकाऊ शेतजमिनी उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येत्या १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात बायका-मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आज, शनिवारच्या बैठकीत शेतकऱ्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी या मोर्चाला जाणार असल्याचे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ मार्चला मुंबईत दहा हजार शेतकऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, संपत देसाई उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारने कुणाची तरी व्यवस्था करण्यासाठी हा महामार्ग लादला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातून चार हजार बाधित शेतकरी उपस्थित राहतील.