‘६ मार्चचा बारावीचा पेपर पुढे ढकला’

By admin | Published: February 15, 2017 03:46 AM2017-02-15T03:46:20+5:302017-02-15T03:46:20+5:30

मुंबईत सहा मार्चला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीच बारावीचा पेपर आहे.

'March 12th post for HSC' | ‘६ मार्चचा बारावीचा पेपर पुढे ढकला’

‘६ मार्चचा बारावीचा पेपर पुढे ढकला’

Next

मुंबई : मुंबईत सहा मार्चला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीच बारावीचा पेपर आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बारावीचा पेपर पुढे ढकलावा अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. बारावीचा ११ ते २ या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र तर दुपारी ३ ते ६ यावेळेत व्यावहारिक हिंदी या विषयाचा पेपर आहेत. एचएचसी व्होकेशनलचा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयाचा पेपर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री तावडे यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: 'March 12th post for HSC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.