२० मार्च जागतिक चिमणी दिन

By Admin | Published: March 20, 2016 12:32 PM2016-03-20T12:32:08+5:302016-03-20T12:32:08+5:30

२० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. एक होती चिऊ. एका होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.

March 20 World Chimpanzee Day | २० मार्च जागतिक चिमणी दिन

२० मार्च जागतिक चिमणी दिन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. एक होती चिऊ. एका होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं. ही पुर्वापर चालत आलेली गोष्ट आपल्याला बालपणी आवडायची. पण सध्या काही वर्षांमध्ये चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. 
 
आपल्या घरात, अंगणात, बिनधास्तपणे वावरणारी चिमणी गायब झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना एक घास चिऊचा असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाही अशी परिस्थिती सध्या ओढवल्याचे दिसते. पुर्वीच्या काळी शहरासह ग्रामीण भागात मातीची घरे होती. 
 
मात्र बदलत्या काळानुसार मातीची घरे जमीनदोस्त झाल्याने सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली. शहरातील झाडे मोठया प्रमाणात तोडली या वन बीएचकेच्या जंगलात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच उरली नाही. याचा परिणाम म्हणून चिमण्यांची संख्या हळूहळू कमी झाली. शहरीकरणामुळे मोठया प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे विणीच्या हंगामात घरटे बांधून अंडी घालण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. 
 

Web Title: March 20 World Chimpanzee Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.