मार्च २०१८ अखेर महाराष्ट्र हागणदारीमुक्त!

By admin | Published: February 7, 2017 04:41 AM2017-02-07T04:41:27+5:302017-02-07T04:41:27+5:30

महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे

By March 2018, Maharashtra is free from the hawkers! | मार्च २०१८ अखेर महाराष्ट्र हागणदारीमुक्त!

मार्च २०१८ अखेर महाराष्ट्र हागणदारीमुक्त!

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सोमवारी मुंबईत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत क्षत्रिय यांनी माहिती दिली. राज्यभरातील हागणदारीमुक्तीबाबत खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारकडे तिसऱ्या पक्षाकडून पुर्नतपासणी सुरू केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
महाराष्ट्राने स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी हात धुणे, मासिक पाळीतील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ध्येयही आम्हाला गाठायची आहेत. त्यासाठी स्वच्छ कार्यालये, स्वच्छ शाळा आदी मोहिमाही राबवल्या जात आहेत, असे क्षत्रिय म्हणाले.
स्वच्छ भारत मिशनच्या मंत्रालयाने राबविलेल्या उपक्रमांत जिल्हा पातळीवर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रेरक उपलब्ध करून दिला जाईल. स्वच्छ भारत मिशनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सहभाग घ्यावा, यासाठी क्षत्रिय यांनी एक विशेष सादरीकरण केले. सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रमांनी त्यांच्या कामगारांना व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून प्रशिक्षित करावे, अशी सूचना डिपार्टमेंट आॅफ पब्लिक एंटरप्रायजेसच्या सचिवांनी या वेळी केली.

Web Title: By March 2018, Maharashtra is free from the hawkers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.