मुंबईत मार्च हिट !
By admin | Published: March 20, 2016 02:14 AM2016-03-20T02:14:16+5:302016-03-20T02:14:16+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. परिणामी, वाढते
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. परिणामी, वाढते ऊन आणि उकाडा मुंबईकरांचा अक्षरश: घाम काढत असून, यात उत्तरोत्तर आणखी वाढ नोंदविण्यात येणार असल्याने यंदाचा उन्हाळा मुंबईकरांसाठी तापदायक ठरणार आहे.
राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. शहरांचे कमाल तापमान थेट ३८ आणि ४० अंशावर पोहोचले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३३-३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. मागील आठवड्यातील शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते. आठवड्याभरानंतर पुन्हा शनिवारी कमाल तापमान ३६.५ अंश नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानातील चढउतारासह वाहणारे उष्ण वारे आणि उकाडा हे घटक वातावरणात भर घालत आहेत. शिवाय दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे.