राज्यात मार्चहीट! चैत्राआधीच वैशाख वणवा; उन्हाचे चटके

By Admin | Published: March 27, 2017 04:39 AM2017-03-27T04:39:46+5:302017-03-27T04:39:46+5:30

चैत्र महिन्याआधीच वैशाख वणवा पेटला असून राज्यातील निम्म्या भागात पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी राज्यातील

March in the state! Vaishakh beforehand; Sunglasses | राज्यात मार्चहीट! चैत्राआधीच वैशाख वणवा; उन्हाचे चटके

राज्यात मार्चहीट! चैत्राआधीच वैशाख वणवा; उन्हाचे चटके

googlenewsNext

पुणे : चैत्र महिन्याआधीच  वैशाख वणवा पेटला असून राज्यातील निम्म्या भागात पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी राज्यातील तब्बल ११ महानगरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते तर उर्वरित शहरांचे तापमानही ४० पेक्षा केवळ
एक-दोन अंशाने कमी नोंदविले  गेले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२़८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ अधिक तापला आहे. तेथील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४०च्या पुढे गेले आहे़ जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली, सोलापूर येथील कमाल तापमानाने चाळिशी पार केली़ मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़
प्रमुख शहरांतील तापमान : भिरा (रायगड) ४३, सोलापूर ४०.८, अकोला ४२, अमरावती ४१.२, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ४२.२, गोंदिया ४१, वर्धा ४२, यवतमाळ ४०, मालेगाव ४१.८, जळगाव ४०.४, नाशिक ३८.४, औरंगाबाद ३८.७, परभणी ३९.९, उस्मानाबाद ३८.९, पुणे ३८.३, कोल्हापूर ३८.२, सांगली ३८.३, सातारा ३८.८, बुलडाणा ३८.७. (प्रतिनिधी)
मुंबई घामाघूम
मुंबईत पश्चिमेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे आर्द्रतेमध्ये भर घालत असून, वाढती आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे.

Web Title: March in the state! Vaishakh beforehand; Sunglasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.