‘नेक्स्ट’विरोधात मार्डच्या डॉक्टरांचा निषेध

By admin | Published: February 3, 2017 01:17 AM2017-02-03T01:17:20+5:302017-02-03T01:17:20+5:30

एमबीबीएसची तिसरी परीक्षा दिल्यावरही डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी २०१८पासून विद्यार्थ्यांना ‘नॅशनल एक्झिट टेस्ट’ (नेक्स्ट) द्यावी लागणार आहे. नेक्स्टला विरोध

Mard's doctor's protest against 'next' | ‘नेक्स्ट’विरोधात मार्डच्या डॉक्टरांचा निषेध

‘नेक्स्ट’विरोधात मार्डच्या डॉक्टरांचा निषेध

Next

मुंबई : एमबीबीएसची तिसरी परीक्षा दिल्यावरही डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी २०१८पासून विद्यार्थ्यांना ‘नॅशनल एक्झिट टेस्ट’ (नेक्स्ट) द्यावी लागणार आहे. नेक्स्टला विरोध करण्यासाठी राज्यभरात विविध रुग्णालयांमध्ये मार्डच्या डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. तसेच, हा निर्णय रद्द करण्यात यावा याविषयी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. एमबीबीएसच्या तीन प्रमुख परीक्षांनंतरही विद्यार्थ्यांना ‘नेक्स्ट’च्या परीक्षेची सक्ती केल्याने या निर्णयाविरोधात डॉक्टरांनी राज्यभर हा निषेध नोंदविला. विद्यार्थी ही परीक्षा पास झाल्यावरच त्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी देण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन करीत आपली भूमिका मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Mard's doctor's protest against 'next'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.