मार्डचा संप अखेर मागे

By admin | Published: August 9, 2014 02:51 AM2014-08-09T02:51:44+5:302014-08-09T02:51:44+5:30

विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणा:या महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

Mard's end is back after | मार्डचा संप अखेर मागे

मार्डचा संप अखेर मागे

Next
>मुंबई : विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणा:या महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेतल्याचे जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेत संघटनेच्या 9क् टक्के मागण्या झाल्या असून, उर्वरित 1क् टक्के मागण्यांचाही विचार केला जाणार आहे. याने निवासी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी रुग्णांना यामुळे अधिक दिलासा मिळाला आहे.
मार्डने शनिवारपासून मास बंक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. या संपामध्ये राज्यातील 14 सरकारी रुग्णालये व 4 हजार निवासी डॉक्टर सहभागी होणार होते. मात्र शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मार्डच्या पदाधिका:यांची आव्हाड यांच्यासोबत ठाणो येथे दोन तास चर्चा झाली. चर्चेअंती आव्हाड यांनी काही मागण्या मान्य झाल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. त्यानंतर मार्डनेही संप मागे घेतला. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक वर्षाच्या कालावधीसाठी करारावर नोकरी करावी लागते. यात पारदर्शकता आणावी, कुठे किती जागा आहेत हे जाहीर करावे आदी मागण्यांसाठी मार्ड संप करणार होते. (प्रतिनिधी)

Web Title: Mard's end is back after

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.