मारियाची कडवी झुंज यशस्वी

By admin | Published: June 8, 2014 01:44 AM2014-06-08T01:44:07+5:302014-06-08T01:44:07+5:30

पाचवे ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हाला रोमानियाच्या सिमोना हॅलेपने झुंजवले.

Maria's bitter battle succeeded | मारियाची कडवी झुंज यशस्वी

मारियाची कडवी झुंज यशस्वी

Next
>फ्रेंच ओपन : सिमोना हॅलेपने दिली जोरदार टक्कर 
्रपॅरिस : पाचवे ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हाला रोमानियाच्या सिमोना हॅलेपने झुंजवले. तीन तास रंगलेल्या या लढतीत मारियाने चिकाटीने खेळ करीत संघर्षपूर्ण 6-4, 6-7 (5-7) व 6-4 असा विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. 13 वर्षाच्या इतिहासात महिला अंतिम फेरीत सर्वाधिक काळ रंगलेली ही दुसरी लढत ठरली. 
पहिल्या सेटमध्येच हॅलेपने आपला करिष्मा दाखविला. 57 मिनिटे हॅलेपने मारीयाला झुंजवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हॅलेपने 2-क् अशी आघाडी घेत मारीयावर दडपण आणले. अशा परिस्थिती मारीयाने आपला अनुभव पणास लावून हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुस:या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंची विजयासाठी धडपड पाहून प्रेक्षकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. टाय ब्रेकर्पयत रंगलेल्या या सेटमध्ये हॅलेपने 7-6 (7-5) अशी बाजी मारली. अखेरच्या सेटमध्ये मारीयाने 6-4 अशी बाजी मारून जेतेपद आपल्या नावावर केले.
 
संडे सुपर ब्लास्ट!
पॅरिस : क्ले कोर्टचा बादशाह अशी ख्याती असलेल्या स्पेनच्या राफेल नदाल याला रविवारी फ्रेंच ओपनचा नववा किताब पटकावण्यासाठी सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच ही ‘भिंत’ पार करावी लागेल. 
नदाल आणि जोकोव्हिच हे फ्रेंच ओपन फायनलच्या निमित्ताने 42 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आकडय़ांवर नजर टाकल्यास नदालने 22 वेळा बाजी मारली आहे. असे असले तरी 2क्12च्या पराभवाची परतफेड करण्यास जोको सज्ज आहे. क्ले कोर्टवर नदालचाच बोलबाला आहे. त्याने येथे 66 विजय साजरे केले असून, केवळ एकच पराभव सहन केला आहे. या लढतीत जेतेपद पटकावून नदालला सलग पाच  फ्रेंच ओपन जेतेपद पटकावण्याची संधी आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. त्याने 2क्1क्, 2क्11, 2क्12, 2क्13 साली जेतेपद पटकावले. त्याचे हे 14 वे ग्रॅण्ड स्लॅम ठरेल व 17 ग्रॅण्ड स्लॅम पटकावणा:या रॉजर फेडररचा विक्रम मोडण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. 
 
1978 साली रोमानियाच्या विर्गिनीआ रुजिसीने फ्रेंच ओपनमध्ये मिमा जाउसोवेकचा 6-2, 6-2 असा पराभव करून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रोमानियाकडून अशी कामगिरी कोणालाच करता आली नाही. 
 
ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद: 
विम्बल्डन (2क्क्4), अमेरिकन (2क्क्6), ऑस्ट्रेलिया (2क्क्8) व फ्रेंच (2क्12, 2क्14)

Web Title: Maria's bitter battle succeeded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.