मच्छिमाराच्या हाती लागला सागरी खजिना; घोळ मासे विकले अन् काही क्षणात कोट्यवधी कमवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:23 PM2021-08-30T23:23:59+5:302021-08-30T23:24:14+5:30

मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी रवाना झाली.

Marine treasures in the hands of fishermen; He sold mixed fish and earned crores in a few moments | मच्छिमाराच्या हाती लागला सागरी खजिना; घोळ मासे विकले अन् काही क्षणात कोट्यवधी कमवले 

मच्छिमाराच्या हाती लागला सागरी खजिना; घोळ मासे विकले अन् काही क्षणात कोट्यवधी कमवले 

googlenewsNext

हितेन नाईक

पालघर - मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले.त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लेडर) ह्याची विक्रीतून त्या मच्छिमार ग्रुप ला सुमारे 1कोटी 32 लाखाची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी रवाना झाली. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशिब फळफळले.सुमारे 12 किलो ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने अपूर्व मच्छिमार आनंदात होते.

घोळ माश्याच्या पोटात असलेल्या भोत ह्याला मोठी किंमत असून नर(मेल) जातीच्या भोताला व्यापारा कडून मोठी किंमत असते.त्या तुलनेत मादी(फिमेल)जातीच्या माश्याच्या भोत ला अगदीच नगण्य किंमत मिळते.उत्तर प्रदेश,बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापारा कडून ह्या भोताची खरेदी केली जाते.ह्या विशिष्ट जातीच्या व्यापाऱ्यांची ह्या व्यवसायात मक्तेदारी असून लिलावा द्वारे ह्या भोताची खरेदी केली जाते.सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते. सातपाटी मध्ये सर्व प्रथम शुक्रवारी ह्या भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाल्यानंतर रविवारी मुरबे येथे 15 ते 20 व्यापाराच्या उपस्थितीत लिलाव पार पडला.ह्यावेळी 1 कोटी 25 लाखाची उच्चतम बोली लागल्याची माहिती पुढे आली.तर घोळ माश्याचे मास 300 ते 350 रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे कळते.

ह्या भोत खरेदी केल्या नंतर खूपच नाजूक रित्या ह्या भोतावर स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते.लहान बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते त्याच धर्तीवर प्रत्येक भोताची काळजी घेताना त्या भोता मधील रक्तपेशी वेगळ्या करून एका बंद खोलीत मोठ्या काचेच्या बल्ब च्या प्रकाशात सुकवले जातात.हॉंगकाँग,मलेशिया,थायलंड आदी देशात ह्या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणार धागा बनवणे आदी साठी ह्याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Marine treasures in the hands of fishermen; He sold mixed fish and earned crores in a few moments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.