बाजार समित्यांना आता तज्ज्ञांचा सल्ला
By admin | Published: June 19, 2015 02:37 AM2015-06-19T02:37:06+5:302015-06-19T02:37:06+5:30
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कृषि प्रक्रिया, वाणिज्य, अर्थ आणि विधी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना विशेष निमंत्रित म्हणून शासनामार्फत
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कृषि प्रक्रिया, वाणिज्य, अर्थ आणि विधी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना विशेष निमंत्रित म्हणून शासनामार्फत नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन्न पणन व विनियमन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता विधी सल्लागार आणि सनदी लेखापाल तसेच शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी असतील. त्यामुळे न्यायालयीन बाबी किवा लेखा संबंधित कामे योग्य मागार्ने हाताळता येतील. पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कृषि उत्पन्न समितीवर चार तज्ज्ञांची तर पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या बाजार समितींवर दोन तज्ज्ञांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली जाईल.